येवला ( नाशिक) - येवला शहरात तीन दिवस पतंग महोत्सव असतो. यावेळी विविध आकाराच्या व विविध प्रकारच्या पतंग येवला शहरात तयार करण्यात येतात. येथील पतंग कारागिर उमाकांत भावसार यांनी ईटीव्ही भारत या नावाचा पतंग यावेळी तयार केला आहे. ही पतंग नागरिकांच्या पसंतीला उतरत आहे.
रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सप्तरंगी -
मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पतंगउत्सव साजरा करण्यात येतो. नाशिकच्या येवल्यातही पतंगउत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी संपूर्ण दिवसभर रंगीबेरंगी पतंगांनी आकाश जणूकाही सप्तरंगी झाल्याचे दिसले. परंतु यंदा या पतंगउत्सवाचे एक वेगळे आकर्षण दिसून आले. पतंग कारागिर उमाकांत भावसार यांनी ईटीव्ही भारत या नावाचा पतंग तयार केला आहे. यावेळी नागरिक पतंगोत्सवात बेभान झाले होते.
हेही वाचा - कोरोना प्रसाराचं मूळ शोधण्यासाठी WHO ची टीम चीनमध्ये दाखल