नाशिक - शहरातील एका हॉटेलचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरणचे सहायक अभियत्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही मारहाण करत असताना जवळच उभ्या असलेल्या नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केला. या व्हिडिओ आधारे भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
भद्रकाली परिसरातील एका हॉटेलचे 3 महिन्यांपासून बिल थकले होते. या कारणास्तव महावितरण कर्मचाऱ्यांनी हॉटेल मधील विद्युत पुरवठा खंडित केला होता. यामुळे पठाण आणि कोकणी यांनी भद्रकाली महावितरण कार्यालयाबाहेर सहायक अभियंता शशांक पेंढारकर यांना केली मारहाण केली. या मारहाण प्रकरणी शशांक पेंढारकर यांनी सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याचा सर्फराज कोकणी आणि आयूब पठाण या दोघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यानंतर पोलिसांनी आयूब पठान या एका संशयिताला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - कोरोनाची दहशत : हिंगोलीत 21 हजार कोंबड्या जिवंत पुरल्या, शेतकरी हतबल