ETV Bharat / state

एकनाथ शिंदे झाले पदवीधर.. नाशिक मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचे निकाल जाहीर - अंतिम वर्ष निकाल यशवंतराव चव्हाण विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यावर्षीही १०० टक्के लागला आहे. कला शाखेतून राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ७७.२५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

eknath shinde graduated
पालकमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 17, 2020, 4:08 PM IST

Updated : Nov 17, 2020, 4:46 PM IST

ठाणे - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यावर्षीही १०० टक्के लागला आहे. कला शाखेतून राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ७७.२५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत, तर सुमन काकडे यांना ७७.७५ टक्के गुण मिळाले आहेत.

वाणिज्य शाखेतून इंग्रजी माध्यमात वैष्णवी म्हात्रे हिला ८१.८३ टक्के गुण मिळाले असून, दर्शन नेरकर यास ७६.५८ टक्के, मराठी माध्यमात अरुण दिवेकर यास ७१.४२ टक्के व दिनेश शाहबाजे यास ६९.८३ टक्के गुण मिळाले आहेत.

ज्ञानपीठ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र असून दरवर्षी या केंद्राचा निकाल १०० टक्के लागतो. या वर्षीही विद्यालयाने आपली परंपरा कायम राखली असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आमच्या विद्यालयाची निवड केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे विद्यालयाचे प्राचार्य सतीश दोडके यांनी सांगितले. शिंदे यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण (प्रत्येकी तीन पेपर) या दोन विषयांची निवड केली होती, अशी माहितीही दोडके यांनी दिली.

मुक्त विद्यापीठातून अनेकांनी आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले

विविध कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडावे लागलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मुक्त विद्यापीठातून अनेकांनी आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले आहे. दरवर्षी अंतिम वर्ष पदवी परीक्षा या मे महिन्यात होतात. परंतु, यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि ऑनलाइन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या, अशी माहिती प्रा. दोडके यांनी सांगितले.

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला होता

एकनाथ शिंदे यांना काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु, शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ त्यांच्यात कायम होती. त्यामुळे, त्यांनी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुन:श्च श्री. गणेशा केला होता.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हा मोठा आधार

गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बीए पदवीधर झालो, याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, काही कारणास्तव शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेलेल्या माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हा मोठा आधार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - शौचालयाच्या टाकीत पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू; पालिकेचा निष्काळजी पणा?

Last Updated : Nov 17, 2020, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.