ETV Bharat / state

Drunken Professor Hit : मद्यपी प्राध्यापकाने भरधाव कार चालवत दहा जणांना दिली धडक, दोघे गंभीर - मद्यपी प्राध्यापकाने भरधाव कार चालवली

प्राध्यापकाने मद्यपान करून जोरदार कार चालवत (Nashik Car Accident) तब्बल दहा जणांना उडवले आहे. त्यामुळे तो जात असलेल्या रस्त्यावर इतर प्रवासी आणि पदाचारीही भयभीत झाले होते. उपनगर परिसरातून निघालेल्या या मद्यपीने टायर फुटेपर्यंत कार चालवली व रस्त्यात समोर येईल त्याला धडक दिली.

car hit
car hit
author img

By

Published : Nov 18, 2022, 9:28 AM IST

नाशिक - शहरात एका प्राध्यापकाने मद्यपान करून जोरदार कार चालवत (Nashik Car Accident) तब्बल दहा जणांना उडवले आहे. त्यामुळे तो जात असलेल्या रस्त्यावर इतर प्रवासी आणि पदाचारीही भयभीत झाले होते. उपनगर परिसरातून निघालेल्या या मद्यपीने टायर फुटेपर्यंत कार चालवली व रस्त्यात समोर येईल त्याला धडक दिली. यात नऊ ते दहा जण जखमी झाले (Drunken professor hit People) असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे..पोलिसांनी तासभर पाठलाग करत मद्यपीला ताब्यात घेतले आहे. साहेबराव दौलतराव निकम असे त्या मद्यपी प्राध्यापकाचे नाव आहे.

दोघे गंभीर - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी एका प्राध्यापकाने मद्यपान करून रस्त्यावर जो आपल्या गाडीसमोर येईल त्याचा जीव धोक्यात घालत, नऊ ते दहा जणांना जखमी केले आहे. लेखानगर चौकापासून पोलिसांनी सुरू केलेला पाठलाग पुढे मुंबई नाका व मायको सर्कलपासून चांडक सर्कल येथे चालकास अटक केली. कारचे पुढचे टायर फुटले असताना देखील चालक गाडी चालवत होता. उपनगर ते चांडक सर्कल दरम्यान झालेल्या घटनेत 9 ते 10 वाहन चालकांसह पादचारांना धडक बसल्याने ते जखमी झाले. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मद्यपी निघाला प्राध्यापक - मद्यपी कारचालक हा नाशिकरोडच्या महाविद्यालयातील प्राध्यापक साहेबराव दौलतराव निकम असल्याचे निष्पन्न झाले आहे. आठ ते दहा किलोमीटर सव्वा तास तो बेधुंद कार चालवत होता. इतर वाहनधारकांनी त्याच्या कारवर दगड फेकत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. चांडक सर्कल येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.