ETV Bharat / state

'आपल्या शेजारचा व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह समजा'

लखमापूर एमआयडीसीत पत्रे बनवणार्‍या कंपनीत तब्बल 47 कामगार करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दिंडोरी शहरात करोनाचा पुन्हा एकदा एमआयडीसीमुळे शिरकाव झाला असुन दिंडोरीत आता सहा रुग्ण वाढले आहेत.

midc dindori
midc dindori
author img

By

Published : Jul 30, 2020, 11:07 AM IST

दिंडोरी ( नाशिक ) - दिंडोरी तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव आहे. तालुक्यात १९१ रुग्ण असून १३१ बाधितांनी कोरोनावरती मात केली आहे. तर ५२ रुग्ण ऍक्टिव्ह आणि आठ रुग्ण दगावले आहेत.

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व पालखेड औदयोगिक क्षेत्रामध्ये चोविस तासात एकशे एक रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी आठ रुग्ण हे दिंडोरी नगरपंचायत व दिंडोरी तालुक्यातील आहेत. ९३ रुग्ण हे नाशिक येथील असून तीन कंपनीमध्ये काही अधिकारी व कर्मचाऱ्यांरी आहेत. ज्या कंपनीत रुग्ण आढळले आहेत त्या कंपन्या सात दिवस बंद करण्याचे पत्र प्रशासनाने दिले आहेत. प्रशासनाच्या मार्फत त्यांना जोपर्यत पुढील आदेश प्राप्त होत नाही तोपर्यत कंपनी बंद ठेवावेत. आपल्या शेजारी जो कोणीही व्यक्ती उभा असल्यास तो पॉझिटीव्हच आहे, असे समजावे. आपण त्यापासून ठराविक अंतर ठेवायला हवे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशीरे यांनी इटीव्ही भारतशी बोलतांना सांगीतले.

लखमापूर एमआयडीसीत पत्रे बनवणार्‍या कंपनीत तब्बल 47 कामगार करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दिंडोरी शहरात करोनाचा पुन्हा एकदा एमआयडीसीमुळे शिरकाव झाला असुन दिंडोरीत आता सहा रुग्ण वाढले आहेत.

दिंडोरी तालूक्यातील कंपन्यामध्ये करोनाचा संसर्ग कामगारांना होऊ लागला आहे. तालुक्यातील पालखेड एमआयडीसीतील पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता पत्रे बनविऱ्या कंपनीत रुग्ण आढळले आहे. या कंपनीत सुमारे 47 रुग्ण पॉझिटिव्ह आले असुन या सर्वांना आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. अगोदरच शिवाजी नगरात बांधकाम व्यावसायिकाला करोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा दोन रुग्णांची भर पडली आहे.

वक्रतुंड नगर, निळवंडी रोड, शिवाजी नगर, लक्ष्मी नगर, घोरपडे अपार्टमेट येथे रुग्ण सापडल्याने आता खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.