ETV Bharat / state

घाबरू नका, काळजी घ्या; कोरोनाशी लढा देणारे भूमिपुत्र स्वरूप दिक्षीत यांचे नाशिककरांना आवाहन - कोरोना परिस्थिती

स्वरूप दीक्षित हे देहरादून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे (आईजीएनएफए) चे प्रशिक्षणार्थीं म्हणून स्थित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी 25 प्रशिक्षणार्थींसह फिंनलँड व स्पेन येथे फॉरेस्टचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केलं. ते 11 मार्चला दिल्ली येथे विमानतळावर आले, तेथे त्यांची कोरोना संदर्भात वैद्यकीय चाचणी झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्या वसतिगृहातील वेगवेगळ्या खोलीत होम क्वारंटाईन करण्यात आलं. दरम्यान, 19 मार्चला स्वरूप यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यांची कोरोना विरोधात लढाई सुरू झाली.

स्वरूप दिक्षीत
स्वरूप दिक्षीत
author img

By

Published : Mar 31, 2020, 8:05 AM IST

नाशिक - घाबरू नका, पण काळजी घ्या असा कळकळीचा सल्ला कोरोनाशी लढा दिलेले नाशिकचे भूमिपुत्र स्वरूप दिक्षीत यांनी नाशिककरांना दिला आहे. स्वरूप दीक्षित हे देहरादून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे (आईजीएनएफए) चे प्रशिक्षणार्थी आहेत.

नाशिकच्या अश्विननगर भागात राहणारे स्वरूप दीक्षित हे देहरादून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे (आईजीएनएफए) चे प्रशिक्षणार्थीं म्हणून स्थित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी 25 प्रशिक्षणार्थींसह फिंनलँड व स्पेन येथे फॉरेस्टचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण केलं. ते 11 मार्चला दिल्ली येथे विमानतळावर आले, तेथे त्यांची कोरोना संदर्भात वैद्यकीय चाचणी झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्या वसतिगृहातील वेगवेगळ्या खोलीत होम क्वारंटाईन करण्यात आलं. दरम्यान, 19 मार्चला स्वरूप यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यांची कोरोना विरोधात लढाई सुरू झाली.

या संकटाच्या वेळी ते कुटुंबापासून दूर होते, त्यांनी ह्याबाबत आई आणि भावला फोनवरून माहिती दिली. घरच्यांनीदेखील स्वरूप यांना धीर दिला. उपचार सुरू असतांना रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांची मोठी मदत झाली. हा आजार जेवढा शारिरीक आहे तेवढाच मानसिकदेखील असून ह्या काळात मन शांत ठेवण्यासाठी मी प्राणायाम केला. मानसिक धीर मिळावा म्हणून मी माझ्यासोबत लहान गणेशाची मूर्तीदेखील ठेवली होती. डॉक्टर आणि नर्स हे स्वतःच्या जीवाची काळजी नं करता त्यांनी माझ्यावर उपाचार तर केलेच पण वेळोवेळी माझा आत्मविश्वासदेखील वाढवला. अशांना मी सलाम करतो, आणि म्हणूनच मी आजारातून बाहेर पडू शकलो असल्याचे स्वरूप यांनी सांगितले.

कृपया घरातच रहा काळजी घ्या, अशी मला जनतेला विनंती करायची आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरीकांनी ह्या कोरोनावर मात करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे. घरा बाहेर पडू नका, प्रशासनने दिलेल्या नियमांचे पालन करा. आपण कधी अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेलोच तर, डोमीनंट हाताने दरवाजा, कडी, रेलिंगला हात लावू नका. अशा वेळी दुसऱ्या हाताचा वापर करावा जेणेकरून दुसऱ्या हाताचा आणि आपल्या नाका तोंडाचा संबंध येणार नाही. लवकरच स्वच्छ आणि स्वस्थ महाराष्ट्र बघायला मिळेल हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे भाव स्वरूप यांनी यावेळी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.