ETV Bharat / state

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रभागनिहाय तपासणी कॅम्पचे आयोजन करावे- कृषीमंत्री दादा भुसे - Minister bhuse on Ward wise inspection camp

यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले, या तपासणी कॅम्पमध्ये प्रामुख्याने नागरिकांमध्ये कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिकार क्षमता चाचणी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात यावी.

Agriculture ministers dadaji bhuse, कृषीमंत्री दादाजी भुसे
Agriculture ministers dadaji bhuse
author img

By

Published : Jun 11, 2020, 9:49 PM IST

नाशिक- कोरोनामुक्तीकडे मालेगाव शहराची यशस्वी वाटचाल सुरू असताना कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी नागरिकांचे प्रभागनिहाय तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिल्या आहेत.

उपपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. मंत्री भुसे म्हणाले की, या तपासणी कॅम्पमध्ये प्रामुख्याने नागरिकांमध्ये कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिकार क्षमता चाचणी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात यावी.

वयोवृद्धांसह लहान मुलांची यात प्राधान्याने चाचणी करून त्यांच्यावर आरोग्य प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देत, ही मोहिम येत्या सोमवारपासून कार्यान्वित करण्याच्या सुचनाही भुसे यांनी दिल्या.

पावसाळा सुरू झाल्यानंतर साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतो. यासाठी महानगरपालिका प्रशासनासह आरोग्य प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश मंत्री भुसे यांनी दिले. तसेच, कोरोना विषाणूमुळे प्रभावित झालेल्या दाखल रुग्णांची व आवश्यक त्या सुविधांची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

यावेळी बैठकीत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.