निफाड (नाशिक) - राज्यातून दरवर्षी रशियामध्ये 30 ते 35 हजार मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात केली जाते. द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरू असताना रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले ( Rassia Ukrain War begin in Grapes Season ) आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यातीवर परिणाम होत द्राक्षाचे बाजार भाव कोसळण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. ( Russia Ukraine Crisis Impact Nifad ) यामुळे निर्यातक्षम द्राक्षसाठी केलेला खर्चही वसूल होईल का नाही? अशी भिती आता द्राक्ष उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून आता द्राक्ष उत्पादकांना घाबरुन न जाण्याचे आव्हान केले जात आहे. हे युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये जरी सुरू असेल. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळणाऱ्या माहितीनुसार रशियामध्ये दळणवळण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. यामुळे निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
हेही वाचा - Russia Ukraine Crisis Live Updates : युक्रेनची राजधानी कीव मध्ये रशियाचा शिरकाव; मोदी-पुतिनमध्ये चर्चा
द्राक्ष निर्यातदार व्यापाऱ्यांना आपली द्राक्ष देताना योग्य बाजार भाव कसा मिळेल? याकडे लक्ष देण्याच्या सूचना सोशल मिडीयाच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना केल्या जात आहे. द्राक्ष निर्यात सुरू राहावी यात कोणताही अडथळा निर्माण होऊन यासाठी केंद्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे संचालक रामनाथ शिंदे यांनी सांगितले.