ETV Bharat / state

मालेगावच्या जीवनचक्राची चाके पुन्हा सुरू, यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी

शहरातील यंत्रमाग सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी व त्यांचे सनियंत्रण करण्यासाठी स्थानिक स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती यंत्रमाग कामगार व कारखानदार यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्यक्त केला.

handloom and power loom unites to resume in malegaon
मालेगावच्या जीवनचक्राची चाके पुन्हा सुरू, यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी
author img

By

Published : Jun 1, 2020, 10:40 AM IST

नाशिक - लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून यंत्रमागाची खडखड थांबली होती. त्यामुळे यंत्रमाग कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. यासाठी शासनाने प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी देखील काही अटी व शर्तीच्या अधिन राहून शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी दिली. त्याअनुषंगाने शहरातील काही यंत्रमागाचा खडखडाट सुरू झाल्यानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.

मालेगावच्या जीवनचक्राची चाके पुन्हा सुरू, यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी

यंत्रमागाचा खडखडाट व कामगारांचा रोजगार अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी कामगारांसह यंत्रमाग चालक व मालकांवर मोठी जबाबदारी आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याची काळजी घेत यंत्रमाग कामगारांना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. आता सुरू करण्यात आलेले यंत्रमाग सुरळीतपणे सुरू राहावे त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील, राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

शहरातील यंत्रमाग सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी व त्यांचे सनियंत्रण करण्यासाठी स्थानिक स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती यंत्रमाग कामगार व कारखानदार यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्यक्त केला.

सय्यद नगर, गुलशीरनगर डेपोपर्यंत सर्व प्रकारचे छोटे व्यवसाय आज(सोमवारी) चालू होते. शहरातील हृदयाचा ठोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यंत्रमाग उद्योगाशी संबंधित काही कारखानेही आज शहरातील काही भागात उघडण्यात आले.

कामगारांमध्ये आनंद-

शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील यंत्रमाग सुरू केल्याबद्दल आम्हाला फार आनंद झाला आहे, मालकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत आम्हाला मदत केली. आम्ही आमचा रोजगार सुरू होण्याची वाट पाहत होतो, आम्हाला आता आनंद आहे की, यंत्रमाग सुरू झाल्यामुळे आमचे सर्व व्यवहार सुरुळीत होतील. आरोग्य प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे आम्ही काटेकोर पालन करु अशी भावना उस्मान गनी या विद्युत यंत्रमाग येथील कामगारांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.