नाशिक - कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून राज्यासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र आता नाशिकमधील विविध ठिकाणी लसीचे उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना लस नाव घेतात माघारी परतावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी पहाटे पासून नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र मोजके डोस उपलब्ध झाल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आता वयोवृद्ध नागरिक आणि लसीचा दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
लसीकरण मोहीम नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असली तरी मात्र लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागत आहे. यामुळे यावर प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत. वयोवृद्ध आणि दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दुसरा डोस असलेल्याना लसीकरणात प्राधान्य दिले जाणार -भुजबळ
एकीकडे पंचेचाळीस वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण देखील लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण दिवसाआड होत असताना दुसरीकडे मात्र केंद्र शासनाकडून 18 वर्षांपुढील तरुणांसाठी लसींच्या साठा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने पुढील काही दिवस केवळ दुसरा डोस असलेल्याना लसीकरणात प्राधान्य दिले जाणार असल्याच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे.
लसीकरण मोहीम आता अडचणीत सापडली -
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याने आता नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत असताना दिसून येत आहेत. मात्र लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण मोहीम आता अडचणीत सापडली आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढून प्रशासनाने ही लसीकरण मोहीम पुन्हा नव्या जोमात सुरू करावी आणि लवकरात लवकर सर्व केंद्रांवर उपलब्ध लसीचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
शहरात लसीकरणाचा फज्जा -
नाशिक शहरात लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे, पहाटे पासून नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. माहिती व्यवस्थित मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचे दिसून आले.
लसीचा दुसरा डोस मिळावा नागरिक भर उन्हात उभे -
शेकडोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दिसून येत आहे, तर अनेक वयोवृद्ध हे पहाटेपासूनच लसीचा दुसरा डोस मिळावा यासाठी भर उन्हात उभे असल्याचे चित्र आहे, तर प्रशासनाच्यावतीने ह्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नसून, कुठल्याही प्रकारची सोय सुविधा देखील ह्या नागरिकांना येथे करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
हेही वाचा - 'भारत बायोटेक'च्या प्लान्टसाठी तातडीने जागा देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार