ETV Bharat / state

Abused Five Girls : धक्कादायक! संस्थाचालकाकडून आश्रम शाळेत शिकणाऱ्या पाच मुलींवर अत्याचार ; माहिती पोलीस तपासात उघड - abused five girls

म्हसरुळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात संस्थाचालक हर्षल माेरे (director of institution Harshal More abused) याने एकाच अल्पवयीन मुलीवर नव्हे, तर एकूण पाच सहा मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली (abused five girls in Ashram) आहे.

Abused Five Girls
पाच मुलींवर अत्याचार
author img

By

Published : Nov 27, 2022, 1:11 PM IST

Updated : Nov 27, 2022, 1:34 PM IST

नाशिक : म्हसरुळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात संस्थाचालक हर्षल माेरे (director of institution Harshal More abused) याने एकाच अल्पवयीन मुलीवर नव्हे, तर एकूण पाच सहा मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली (abused five girls in Ashram) आहे. आश्रमातून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे पीडितांपैकी कोणीही तक्रार केली नाही.

अत्याचार व अपकृत्य : म्हसरुळ शिवारातील द किंग फाउंडेशन संस्थेच्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात (Gyandeep Gurukul Aadhaar Ashram in Mhasrul) २०१८ ते २०१९ पासून संशयित मोरे याने मुलींचा विनयभंग तसेच त्यांच्यावर व वेगवेगळ्या बहाण्याने अत्याचार व अपकृत्य केल्याचे विद्यार्थिनींच्या चौकशीतून समोर आले आहे. यात चार अल्पवयीन तर एक सज्ञान मुलीकडून असे वेगवेगळे पाच गुन्हे दाखल नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर यातील एक गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात चौदा वर्षांच्या मुलीवर संशयित संस्थाचालक हर्षल मोरे याने बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने तपासाला सुरुवात करीत अन्य मुलींचेही जबाब (abused five girls in Nashik) नोंदविले.

मुलींबरोबर गैरकृत्य : यात अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले, असून मोरे याने मुलींना हातपाय दाबायला बोलवून हे प्रकार करत असल्याचे आढळले आहे. हर्षल मोरे याने मुलींना आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याची पुढे आले आहे. नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीवर मोरे याने बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर तिने जवळच्या नातेवाइकांकडे याबाबत माहिती दिली होती. आधार आश्रमतील मुली एकमेकांना विचारणा करायच्या मात्र आश्रमातून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे पीडितांपैकी कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. तसेच मुलींवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार होत असल्याची बाब पुढे आली आहे. आधार आश्रमातील सर्व मुलींची चौकशी केली असता काही मुलींबरोबर गैरकृत्य झाल्याचे समोर आले आहे. सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यानी सांगितले (abused five girls) आहे.

Last Updated : Nov 27, 2022, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.