ETV Bharat / state

नाशकात कोरोनानंतर डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले, ३०० हून अधिक बाधित

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता पावसाळ्यात किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसात डेंग्यूचे 177 तर चिकनगुनियाचे 175 रुग्ण आढळले आहेत.

Dengue and Chikungunya patients increased in Nashik
नाशकात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले
author img

By

Published : Jul 25, 2021, 7:43 AM IST

Updated : Jul 25, 2021, 9:53 AM IST

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता पावसाळ्यात किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसात पालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यूचे 177 तर चिकनगुनियाचे 175 रुग्ण आढळले आहेत. शहरात खाजगी रुग्णालये तसेच खाजगी लॅबकडून निदान झालेले अहवाल पालिकेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने खासगी लॅबला डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या बाधित रुग्णांचा अहवाल पाठविण्याची सक्ती करण्यात आली. त्या पद्धतीने करावी अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

नाशकात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले

सातपूर आणि भगूर भागात सर्वाधिक रुग्ण

सातपूर विभागामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदी आजारांच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार विभागातील रुग्ण संख्या 100 हुन अधिक असून त्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच भगूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनिया सारख्या आजाराचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून 'आरोग्यम् धनसंपदा अभियान' राबविण्यात आले. यामध्ये 150 हुन अधिक नागरिकांनी सहभाग नोदंविला. येथील प्रेरणा बलकवडे यांनी झेप भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून बलकवडे कोविड सेंटरच्या प्रांगणात या उपक्रमाचे आयोजन आयोजन केले होते. यामध्ये गंगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने डॉ.भूषण देशमुख यांसह नितीन पुलेकर यांनी नागरिकांची हाडांची तपासणी व उपचार केले.

नागरिकांनी तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार करावेत - बलकवडे

भगूर शहरात घरोघरी लोक डेंग्यू चिकनगुनिया नंतर होणाऱ्या अंग व हाडे दुखीमुळे हैराण आहेत. गावात होमिओपॅथी डॅाक्टरांकडून ॲलोपथी औषधे घेऊन त्रासात काही फार फरक पडत नाही. अश्या वेळी लोकांना तज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य धनसंपदा आभियानाच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.

चिकनगुनियाचे लक्षणे -

ताप, हात पायांना तीव्र वेदना, मळमळ, उलटी, थंडी वाजणे, पुरळ, निद्रानाश, अतिसार इत्यादी.

पेस्ट कंट्रोल आभाव -

डेंग्यूचा प्रादुर्भाव होत असल्याने महानगरपालिकेने परिसरातील टायर, नारळाच्या करवंट्या तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, करोडो रुपये खर्च करून शहरात पेस्ट कंट्रोल होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पेस्ट कंट्रोलचा नवीन ठेका आठ महिन्यापासून न्याय प्रविष्ट असल्याने महानगरपालिका हतबल असल्याचे चित्र आहे.

Last Updated : Jul 25, 2021, 9:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.