ETV Bharat / state

नाशिकमध्ये मराठा समाजाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी - नाशिक मराठा आंदोलन अपडेट

नाशिकमधील विविध मराठा संघटनांनी सकल मराठा समाजाच्या वतीने आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे तक्रात दाखल केली आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Oct 8, 2020, 3:31 PM IST

नाशिक - गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मराठा समाज आणि संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.

गुणरत्न सदावर्ते यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्वच स्तरातून सदावर्ते यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. याचेच पडसाद गुरुवारी नाशिक शहरामध्ये देखील बघायला मिळाले. नाशिकमधील विविध मराठा संघटनांनी सकल मराठा समाजाच्या वतीने आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे तक्रात दाखल करण्यात आली. नियमांचे पालन करून मराठा समाज आपला आरक्षणासाठीचा संघर्ष करत असताना सदावर्ते अशी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत यावेळी मराठा बांधवांनी व्यक्त केले.

हेही वाचा - नाशकात एकाच वेळी 36 गुन्हेगारांच्या घरी पोलिसांचे छापे; 37 शस्त्र केले हस्तगत

छत्रपतींबद्दल विधान करण्यास आपण पात्र आहोत का? याचा आधी विचार सदावर्तेंनी करावा, असा सल्ला देत मराठा समन्वयकांनी सदावर्ते यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. गुणरत्न सदावर्ते नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

दरम्यान, आधीच आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मराठा बांधव अनेक दिवसांपासून संघर्ष करत असताना त्यांचा संयम सुटत असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. त्यातच गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदावर्ते यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.