ETV Bharat / state

लाचखाेर ‘पीएफ’ आयुक्त अटकेत, दिल्ली सीबीआय पथकाची नाशिकमध्ये कारवाई - पीएफ एजंट

Delhi CBI Action in Nashik : एका पीएफ प्रकरणाचा निपटारा करुन देण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागणाऱ्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांसह तिघांना दिल्लीच्या सीबीआय पथकानं नाशिकमध्ये अटक केलीय.

CBI team Arrest PF Commissioner
CBI team Arrest PF Commissioner
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 1:03 PM IST

नाशिक Delhi CBI Action in Nashik : एका कंपनीतील पीएफ प्रकरणाचा निपटारा करुन देण्यासाठी दाेन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नाशिक येथील विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तासह इतर दोन जणांना गुरुवारी सीबीआयनं अटक केली. यासंदर्भात गुन्हा करण्यात आला असून, संशयित आयुक्ताच्या घरासह अन्य सात ठिकाणी पथकानं धाडसत्र राबवत राेख रकमेसह अर्थपूर्ण व्यवहाराची नाेंद असलेली डायरी जप्त केलीय. गणेश आरोटे असं संशयित प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्ताचं नाव असून कार्यालयातील अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा आणि खासगी पीएफ एजंट बी.एस. मंगलकर अशी तिघा संशयितांची नावं आहेत.

सापळा रचून संशयितांना घेतलं ताब्यात : तक्रारदाराच्या फर्मशी निगडीत पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दाेन लाख रुपये लाच द्यावी लागेल, असं भविष्य निर्वाह निधी आयुक्त आराेटे यानं तक्रारदाराला खासगी पीएफ एजंटच्या माध्यमातून सांगितलं हाेतं. यानंतर तक्रारदारानं सीबीआयकडे तक्रार नाेंदवली. त्यानुसार सीबीआयनं सापळा रचून खासगी एजंट, ईपीएफओच्या वरील दाेन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. यानंतर नाशिकमध्ये सीबीआयच्या पथकानं सात ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये रोख रक्कम, अयोग्य पद्धतीनं फायदा घेतल्याचे तपशील लिहिलेल्या डायऱ्या इत्यादी, गुन्हा करताना वापरलेलं साहित्य ताब्यात घेण्यात आलंय.

1 जानेवारी पर्यंत पाेलीस काेठडी : याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयितांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलं असता, न्यायालयानं त्यांना 1 जानेवारी 2024 पर्यंत पाेलीस काेठडी सुनावलीय. ही कारवाई सीबीआय पोलीस निरीक्षक रणजित पांडे यांच्या पथकानं केलीय.

कोयत्यानं वार करुन लुटणाऱ्या तिघांना अटक : बारा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका दुचाकीस्वाराच्या डोक्यात कोयत्यानं वार करुन एक लाख 68 हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. ही लुटमार करणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी अटक केलीय. तसंच त्याच्याकडून लुटीची रक्कमही आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केलीय. विजय काकडे, शहाबाज शफी शेख, सोनू छबू गवळी अशी लुटमार करणाऱ्यांची नावं असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलीय.

हेही वाचा :

  1. रेल्वे अधिकाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी, लाच घेताना रंगेहाथ पकडले
  2. CBI Raid: सीबीआयने मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांसह 14 आरोपींविरुद्ध गुन्हा केला दाखल, दोन वेगवेगळ्या प्रकरणात 8 ठिकाणी झाडाझडती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.