नाशिक - शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 1822 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महानगरपालिका दप्तरी करण्यात आली असून, या मृत्यूंपैकी 1670 जणांचे डेथ ऑडिट करण्यात आलं आहे. यातील बहुतांश जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेल्या न्युमोनिया आणि लग्स फायब्रोसिसमुळे झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील अनेक जणांना मधुमेह आणि अति उच्च रक्तदाबाचा आजार असल्याचे देखील समोर आले आहे.
'न्युमोनिया ठरतो घातक'
कोरोनाचे तीव्र लक्षणे असून सुद्धा रुग्णांनी वेळेवर उपचार घेतले नाही तर कोरोना बळावतो, त्यामुळे रुग्णाला न्युमोनिया होतो. अशात रुग्णाच्या शरीराने औषध उपचाराला प्रतिसाद दिला नाही तर रुग्णांची प्रकृती चिंताजनक होते. त्याला लग्स फायब्रोसिस आजाराचा सामना करावा लागतो. रुग्णांला श्वास घेण्यास अति त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला व्हेंटिलेटच्या साह्याने ऑक्सिजन देण्यात येतो. मात्र असे रुग्ण वाचण्याची शक्यता जवळपास 95 टक्के कमी असते, असं तज्ज्ञ सांगतात.
कोरोनामुक्तांच्या मृत्यूचे प्रमाण देखील अधिक
बरेच रुग्ण कोरोनामुळे ऍडमिट झाल्यानंतर ते कोरोनावर मात करतात. मग पेशंटला कोविड वॉर्डमधून नॉन कोविड वॉर्डमध्ये शिफ्ट केलं जातं. बरेच रुग्ण हे बायोपेप आणि व्हेंटिलेटरवर असतात, त्यांतील काही जणांचा मृत्यू एक ते दीड महिन्याने होतो. तो मृत्यू कोविड डेथमध्ये समाविष्ट होत नाही, नॉन कोविडला त्याची नोंद होते. मात्र त्याचा मृत्यू जरी नॉन कोविड म्हणून झाला असला तरी, त्याचे मुख्य कारण कोविड आहे. याकाळात त्याच्या लंग्समध्ये फायब्रोसिस होतात. ते लवकर रिकव्हर होत नाहीत, आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ. शाम पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'ब्लॅक फंगसचा सामना करण्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील'