नाशिक - उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून धरणांतील जलसाठा झपाट्याने घट होत आहे.आजमितिला जिल्ह्यातील धरणांत ३३ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण तीन टक्क्यांनी कमी म्हणजे २९ टक्के होता. मान्सूनचे आगमन दरवेळेपेक्षा अगोदर होणार असे भाकित वेधशाळेने वर्तवले असले तरी पावसाचे आगमन लांबणीवर गेले तर जिल्ह्यात पाणीबाणीेचे संकटाला तोंड द्यावे लागू शकते.
२४ पैकी दोन धरणे कोरडी - धरणांचा जिल्हा अशी नाशिकची ओळख असली तरी वाढत्या तापमानाच्या पार्यामुळे जिल्ह्याचा घसा तहानेने कोरडा होत आहे. उन्हाचा वाढत्या झळांमुळे ग्रामीण भागात पाण्याची वाढलेली मागणी व झपाट्याने होणारे बाष्पीभवन यामुळे जलसाठा वेगाने खालावत आहे. २४ पैकी दोन धरणे कोरडी पडली असून २१ टीएमसी इतकाच जलसाठा शिल्लक असून त्यावर पुढिल एक ते दीड महिना जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे. चिंतेची बाब म्हणजे नाशिक शहराची तहान भागविणार्या गंगापूर धरणात ३८ टक्केच जलसाठा शिल्लक असून गतवर्षी हे प्रमाण ४८ टक्के इतके होते. मान्सूनचे उशीराने आगमन झाल्यास नाशिककरांना जलसंकटाला तोंड द्यावे लागू शकते. अनेक लघु व मध्यम धरणांतून शेवटच्या टप्पातील पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जात असल्याने येत्या काळात जलसाठा आणखी खालवण्याची चिन्हे आहेत.
गंगापूर - ३८
कश्यपी - २७
गौ.गोदावरी - ४०
आळंदी - १२
पालखेड - ११
करंजवण - २७
वाघाड - ६
ओझरखेड - ३०
पुणेगाव - १६
तिसगाव - ७
दारणा - ३८
भावली - २३
मुकणे - ४०
वालदेवी - २२
कडवा - २१
ना.मध्यमेश्वर - १००
भोजापूर - ११
चणकापूर - ४२
हरणबारी - ४८
केळझर - २५
नागासाक्या - ०
गिरणा - ३८
पुनद - १८