नाशिक - शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजार पेठेत विक्री व निर्यातीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन, शेतमालाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढावी याकरिता राज्य स्तरावर कृषी विभागामार्फत कृती दल गठीत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
रोगप्रतिकार क्षमता वाढावी यासाठी आहारात समावेश होणे आवश्यक
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज नाशिक पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांची रोग प्रतिकार क्षमता वाढावी यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृषी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान रानभाजी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असून त्या पौष्टीक व जीवनसत्वयुक्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरीकांनाही त्याची माहिती मिळावी हा या सप्ताहाचा महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे रानभाजी महोत्सव एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता पावसाळ्यात दर रविवारी किंवा महिन्यातून किमान एक-दोनवेळा याचे आयोजन करावे, अशा सुचनाही कृषी मंत्री भुसे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महोत्सवात नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या 80 जास्त पालेभाज्या
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये रानभाज्या महोत्सवाच कृषी मंत्री दादा भुसे याच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. या ठिकाणी जिल्ह्यात पीकणाऱ्या वेगवेगळ्या भाजी पाल्यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यात पिकणाऱ्या रानभाज्या त्यात देव अंबाडी, सफेद अंबाडी, कडू कंद, बोंबडा, अकरीची भाजी, काकड, कोचाई, भोकर आशा 80 भाज्याचे प्रदर्शन लावले आहे. या भाज्या कुठल्याही प्रकारचे खत न वापरता नैसर्गिक पद्धस्तीने उगवलेल्या आहेत. अस शेतकरी यांनी सांगितलं आहे. त्याच बरोबर या भाज्या शरीरासाठी पोषक आणि चांगल्या असल्याचं मत देखील व्यक्त केलं आहे. या वेळी नागरिकांनी रान भाज्यांचं महत्व कळण्यासाठी रानभाज्या माहिती पुस्तकाचं देखील प्रकाशन या वेळी करण्यात आल आहे.
हा मोहोत्सव 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत नाशिकच्या त्र्यंबकरोड वरील पंचायत समितीच्या प्रगणात होत आहे. या ठिकाणी रानभाज्याची विक्री देखील होत आहे. त्यामुळे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होऊन, ग्राहकांना आरोग्यपूर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये महिलेचा आत्महदनाचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात गुन्हा
हेही वाचा - जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद