नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असला तरी मागील दोन दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले आहे. मंगळवारी 473 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तुलनेत 239 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 12 हजार 727 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच 9 हजार 871 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे कोरोनामुळे 472 जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 43 हजार 434 संशयितांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 12 हजार 727 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 29 हजार 696 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 2 हजार 484 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
नाशिकच्या पंचवटी विभागात सर्वाधिक रुग्ण
नाशिकमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पंचवटी भागात आढळून आले आहेत. शहरात असलेल्या 8 हजार रुग्णांमधील 2 हजार 292 रुग्ण फक्त पंचवटी विभागातील आहे. तसेच पूर्व विभागात 1 हजार 669 नाशिकरोड विभागात 1 हजार 31, पश्चिम विभागात 780, सिडको विभागात 1 हजार 94, सातपूर विभागात 712 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पंचवटी विभागकडे लक्ष केंद्रित केले असून, संशयित रुग्णांच्या तपासण्या करण्यात येत आहे.
मृतांची संख्या
नाशिक ग्रामीण - 113
नाशिक मनपा - 256
मालेगाव मनपा - 84
जिल्हा बाह्य -19
एकूण नाशिक जिल्ह्यात - 472
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती -
नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण -12727
कोरोनामुक्त - 9771
एकूण मृत्यू - 472
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण - 2484