ETV Bharat / state

बँकांचा शेतकऱ्यांना दिलासा... आतापर्यंत 1 हजार 807 कोटींचे पीक कर्ज वाटप

author img

By

Published : Sep 2, 2020, 7:57 PM IST

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मागच्या वर्षी ज्या लोकांचे कर्ज थकीत होते, त्यांचे कर्ज शासनाने फेडून त्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरविले. साधारणपणे 1 हजार 75 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. नवीन कर्ज घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत 245 कोटीपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले आहे.

आतापर्यंत 1 हजार 807 कोटींचे पीक कर्ज वाटप

नाशिक - मागच्या वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास 340 कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. 2019 मध्ये पीक कर्ज वाटपाचे 3 हजार 147 कोटींचे उद्दिष्ट असताना शेतकऱ्यांना मागील वर्षी आजच्याच घडीला 1 हजार 467 कोटी इतके वाटप करण्यात आले होते. परंतु, यंदा 3 हजार 303 कोटींचे उद्दिष्ट असून आतापर्यंत वाटप 1 हजार 807 कोटींचे झाले आहे. त्यामुळे ही अतिशय समाधानाची बाब असल्याचे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांना वेळेत कर्जवाटप व्हावे, यादृष्टीने दर आठवड्याला घेण्यात येणाऱ्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दू शेखर, राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले. सर्वाधिक उद्दीष्टे देण्यात आलेल्या मुख्य दहा बँकांमार्फत आतापर्यंत 1 हजार 610 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा - नाशिक पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे.. नांगरे-पाटलांची मुंबईत कायदा सुव्यवस्था विभागात बदली

मुख्य दहा बँकांची पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 63 टक्के असून, काही बँकांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि तत्परतेने कर्ज वाटप केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र 65 टक्के, ‘एनडीसीसी’ने सर्वसाधारण कर्जवाटप 336 कोटीपर्यंत केले आहे. तर इतर बँकांनीदेखील खूप चांगल्या प्रकारे कर्ज वाटप केलेले आहे. अशाप्रकारे जास्त उद्दीष्टे असलेल्या राष्ट्रीयकृत बँक व ज्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त उद्दीष्टे आहे अशांनी चांगल्या प्रकारे काम केल्याने जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कर्जमुक्ती योजनेतून 245 कोटी रुपयांचे कर्ज वाटप
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मागच्या वर्षी ज्या लोकांचे कर्ज थकीत होते, त्यांचे कर्ज शासनाने फेडून त्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरविले. साधारणपणे 1 हजार 75 कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. नवीन कर्ज घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत 245 कोटीपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने जास्तीत जास्त कर्ज वाटप करावे
कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्हा बँकेला 915 कोटी रुपये मिळालेले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत 88 कोटी रुपये कर्जवाटप झाले असून, आत्तापर्यंतत 135 कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. तरीही जिल्हा बँकेला सर्वाधिक 915 कोटींचे रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दीष्टे असल्याने त्यांनी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.