मुंबई Police Constable Died In Mumbai : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या लोकलनं दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये गर्दीचा महापूर असतो. मात्र लोकलमधील गर्दी पोलिसाच्या जीवावर बेतली आहे. लोकलमधून पडून अमित ज्ञानेश्वर गोंदके या पोलिसाचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना भांडूप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. अमित ज्ञानेश्वर गोंदके यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. त्यामुळे पोलिसाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गर्दीमुळे लोकलमधून पडून झाला पोलिसाचा मृत्यू : अमित ज्ञानेश्वर गोंदके हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर तैनात होते. शुक्रवारी रात्री कर्तव्य निभावल्यानंतर ते घराकडं डोंबिवलीत परत जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र भांडूप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे लोकल रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅवर आढळून आला. गर्दीमुळे त्यांचा तोल गेला असावा, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.
कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा : अमित ज्ञानेश्वर गोंदके यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली. त्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे रेल्वे पोलीस दलातीलच पोलिसांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र लोकलमधून पडून पोलिसाचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :
- व्हिडिओला लाईक्स मिळावे म्हणून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; ट्रेनमधून पडल्यानं हात-पाय तुटले, व्हिडिओ व्हायरल - Mumbai Local Train Stunt Video
- काळ आला होता, पण . . . रेल्वे ट्रॅकवर पाय घसरुन पडली महिला: दोन्ही पाय गमावले, थोडक्यात वाचला जीव - Mumbai Local Train Accident
- हृदयदायक! आईसोबत प्रवास करणाऱ्या 17 वर्षीय मुलाचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू