ETV Bharat / state

पेरणीनंतर पाऊस गायब.. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची गरबड केली. तालुक्यातील 70 टक्के शेतकऱ्यांची पेरणी उरकली आहे. मात्र, पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली.

crisis-of-double-sowing-on-farmers-in-manmad-nashik
पेरणीनंतर पाऊस गायब..
author img

By

Published : Jun 25, 2020, 7:27 PM IST

मनमाड- सध्या पावसाळा सुरू झाला असून खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. तालुक्यातील 70 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याचा प्रकार तातुक्यातील अनेक ठिकाणी घडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

पेरणीनंतर पाऊस गायब..

जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची गरबड केली. तालुक्यातील 70 टक्के शेतकऱ्यांची पेरणी उरकली आहे. मात्र, पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पेरलेले बियाणे काही प्रमाणात उगवलेच नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सरकारने कर्जमाफी केली असली तरी नव्याने पिककर्ज देण्यासाठी बँका तयार नाहीत. एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहे. मात्र, कर्जासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवल्या तरी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना खासगी सावकाराशिवाय पर्याय नाही. त्यात उत्पन्न कमी, नैसर्गिक संकट, भाव न मिळणे अशा अडचणी आहेत.

पावसाने अशीच पाट फिरवली तर दुबार पेरणीचे मोठे संकट असणार आहे. त्यात शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. त्यामुळे बँकांनी विनाविलंब शेतकऱ्यांना पिककर्ज द्यावे, अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.