ETV Bharat / state

ठक्कर डोम येथील 325 बेडचे कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित - ठक्कर डोम कोविड केअर सेंटर बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. तर, ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे.

Thakkar Dome Covid Care Center re-open news
ठक्कर डोम कोविड केअर सेंटर कार्यान्वित
author img

By

Published : Apr 11, 2021, 6:58 AM IST

नाशिक - शेवटचा रूग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही, असे मत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकच्या ठक्कर डोम येथे 325 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले.

नाशिकमध्ये कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आले

सामाजिक संस्थांनी मदत करावी -

नाशिकच्या ठक्कर डोम येथे 325 बेडच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निर्मिती नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संस्थेने केली आहे. या ठिकाणी अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा असून शेवटचा रूग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. त्यामुळे इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मनुष्यबळाची कमी -

गेल्यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोम कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा ही व्यवस्था बंद केली. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा हे कोविड सेंटर कार्यान्वित करावे लागत आहे. उपाययोजना करत असताना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आपण कमी पडत आहोत, ही वास्तविकता आहे. कोरोनाच्या या कामासाठी खासगी डॉक्टर्स, परिचारिकांनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

कोविड केअरमध्ये अत्याधुनिक सुविधा -

325 बेडच्या या कोविड केअर सेंटरमध्ये महिलांसाठी 125 बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधित रूग्णांची मानसिकता चांगली रहावी यासाठी योगा, मेडिटेशन, कॅरम, टीव्ही आदी मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चोवीस तास तज्ञ डॉक्टरांची टीम तैनात असणार आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - लॉकडाऊनसंदर्भात टास्क फोर्सची आज महत्वाची बैठक, काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.