ETV Bharat / state

नाशिक; एका दिवसाच्या नवजात अर्भकाची कोरोनावर यशस्वीपणे मात

author img

By

Published : Apr 27, 2021, 6:58 PM IST

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अनेक जर घाबरून जातात, अशात हा आजार अधिक बळावतो. मग चिंता करून प्रकृती अधिक बिघडते, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, नाशिकमधील एक दिवसाच्या बाळाने कोरोनावर मात करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

एका दिवसाचे बाळ
एका दिवसाचे बाळ

नाशिक - शहरामधील अशोक मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये एका दिवसाच्या नवजात अर्भकानीं कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. डॉक्टरांनी योग्य निदान करत नवजात अर्भकास वेळेवर उपचार दिल्यानं त्याने कोरोनावर मात केल्याचं बाळाच्या कुटुंबाचे म्हणणं आहे.

बाळाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांच्या चमूला यश
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अनेक जर घाबरून जातात, अशात हा आजार अधिक बळावतो. मग चिंता करून प्रकृती अधिक बिघडते, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, नाशिकमधील एक दिवसाच्या बाळाने कोरोनावर मात करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नाशिक येथील अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. महिलेने एका २.७६० किग्रॅ. वजनाच्या एका गोंडस बालकाला जन्म दिला. अशात त्या महिलेच्या कुटुंबात अतिशय आनंदाचे वातावरण झाले होते, मात्र, जन्मानंतर काही तासातच त्या अर्भकास श्वासोच्छवास करण्यास त्रास होऊ लागला. व बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. बाळाच्या हृदयाची गती व रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले. बाळाच्या फुफ्फुसांमध्ये निमोनियाची लक्षणे दिसून आली व बाळाच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत दोष असल्याचे निदर्शनास आले. त्यात बाळाचा एच आर सिटी स्कोर १२ होता. आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधा, सर्व ज्युनियर डॉक्टरांचे परिश्रम व उपचार पद्धतीच्या जोरावर 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर या बाळाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांच्या चमूला यश मिळाले आहे. यामध्ये हॉस्पिटलमधील प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ व ज्युनियर डॉक्टर यांच्या परिश्रमाने बाळ कोरोनामुक्त होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आईमुळे बाळाला कोरोनाचा संसर्ग.
आई गर्भवती असताना शेवटच्या तीन महिन्यात बाळाच्या आईला नकळतपणे कोविडचा जंतुसंसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बाळाच्या आईमध्ये निर्माण झालेले अँटीबॉडीज नाळद्वारे बाळाच्या शरीरामध्ये पोहोचले व त्यामुळे बाळाच्या फुफ्फुस, हृदय, व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. याला वैद्यकीय भाषेत FIRS (Fetal Inflammatory Response Syndrome) म्हणतात. एक दिवसाच्या बाळामध्ये निदर्शनास आलेली FIRS जगात एखाद दुसऱ्या घटनेचा उल्लेख वैद्यकीय शास्त्रात आहे. भारतात ही पहिली घटना आहे, असे डॉ. सुशील पारख यांनी सांगितले. गर्भवती महिलेला कोविडचा जंतुसंसर्ग झाल्यामुळे नवजात अर्भकाच्या हृदयावर व फुफ्फुसावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. गर्भवती महिलेची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे या महिलांनी अतिशय काटेकोरपणे कोविडपासून वाचण्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व त्यामुळे बाळाला होणारा संभाव्य दुष्परिणाम टाळता येतो, असे आवाहन डॉ. सुशील पारख यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.