ETV Bharat / state

कोरोनाचा नवा व्हेरियंट सक्रिय; नाशिक आरोग्य यंत्रणा 400 बेडसह सतर्क - जेएन वन

Corona Threat: भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा सक्रिय झाला आहे. याला आळा घालण्यासाठी नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. कोरोनावर लगेच नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात तीनशे तर जाकीर रुग्णालयात शंभर असे चारशे बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

Corona Threat
कोेरोना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 3:57 PM IST

नाशिक Corona Threat : देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आल्यानं केंद्राच्या आरोग्य विभागानं राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी याबाबत आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात तीनशे आणि जाकीर रुग्णालयात शंभर असे चारशे बेड राखीव ठेवले आहेत. आवश्यकता वाटल्यास 'आयटीपीसीआर' तपासणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा : केरळ राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या तब्बल 111 रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे आरोग्य यंत्रणेला धक्का बसलाय. त्यामुळे कोरोनाचा नवा व्हेरियंट पुन्हा हातपाय पसरू लागलेला दिसत आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नाही तर नागरिकांनाही आरोग्य विषयी समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपायांवर काम करून काही पर्यायी नियमावली व्यवस्था उभ्या कराव्यात अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.

खबरदारीच्या सूचना : शहरात सध्या डेंगू आटोक्यात आहे. झिका संशयित गर्भवती महिलांचे 23 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर शहरातील आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच काही रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत असल्याचं नाशिक महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितलं आहे.

डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास : कोरोनाच्या नवीन व्हेरियंट 'जेएन वन' काही दिवसांमध्ये समोर आला आहे. सध्या चीन, अमेरिका, सिंगापूर आणि भारतामध्ये या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. या संसर्गामध्ये रुग्णाला डोकेदुखी, सर्दी-पडसं असा त्रास होतो. सद्यस्थितीत या संसर्गाने भारतामध्ये हातपाय पसरले नसले तरी सुरुवातीला या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा जाणीवपूर्वक कठोर पावलं उचलताना दिसत आहे.

हेही वाचा:

  1. सावधान 'तो' पुन्हा येतोय! केरळनंतर ठाण्यातही आढळला कोरोनाच्या नवीन जेएन1 व्हेरिएंटचा पहिला रुग्ण
  2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघाच्या रेशीमबागेत; म्हणाले "हा पुरोगामी महाराष्ट्र"
  3. विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 2023 : हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, विरोधक आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.