नाशिक - जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज (शुक्रवारी) कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर तिचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याने तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ वर पोहीचली आहे.
या महिलेवर नाशिक येथे उपचार सूरू होते. मात्र, तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने शहरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. कालच गुरुवारी ११ जून रोजी ७२ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा नाशिक येथे उपचारादरम्यान कोरोना मुळे मृत्यू झाला होता. तर लगेच आज दुसऱ्याच दिवशी कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. आज परत नवीन एका 46 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
येवला शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आत्तापर्यंत येवला तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ५५ वर जाऊन पोहोचली असून यातील ५५ जण हे कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ९ जणांवर सध्या उपचार सुरू असून आतापर्यंत कोरोनाने तालुक्यात 4 जणांचा बळी घेतला आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या व कोरोना या आजाराने मुत्यूचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याने येवलेकरांच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे.