ETV Bharat / state

मी कोरोनाबाधित झालो म्हणून समाज मला नाकारतो; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टराची खंत... - nashik district hospital

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना शेजारी आणि रुग्णालयातील यंत्रणेचा वाईट अनुभव आला. त्याबद्दल व्हिडिओतून त्यांनी खंत केली आहे.

representational image
प्रतीकात्मक फोटो
author img

By

Published : May 8, 2020, 11:33 AM IST

नाशिक- मी कोरोनाबाधित झालो म्हणून समाज मला नाकारतो, अशी खंत जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टराने व्यक्त केली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाली. यानतंर त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्यांना शासकीय यंत्रणेचा आलेला वाईट अनुभव त्यांनी व्हिडीओतून मांडला आहे.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. त्यांनी अनेक चिमुकल्यांच्या मुलांच्या घशात अडकलेल्या वस्तू काढून त्यांना जीवदान दिले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा रुग्णालयात आपला मोठा सहभाग दिला आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात ठेवण्यात आले आहे. या संकटाच्या काळात त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणच्या शेजाऱ्यांचा आणि जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेचा वाईट अनुभव आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार एखाद्या व्यक्तीला कोरोनाची कुठलीही लक्षणे नसतील. मात्र, त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर, तो आपल्या घरात विलगीकरणात राहू शकतो, असे डॉक्टरांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटले आहे. मात्र, असे असताना माझ्या शेजारच्या व्यक्तींनी मला माझ्याच घरात राहण्यास विरोध केला आहे.

आपण जर डॉक्टरांना देव म्हणतो. मग नागरिकांनी डॉक्टरांना अशी वागणूक देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी खंत व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा देखील त्या डॉक्टरला वाईट अनुभव येत आहे. मास्क, सॅनिटाझर आणि चहासाठी वारंवार मागणी करावी लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.