ETV Bharat / state

बकरी ईदवर कोरोनाचे सावट; विक्रीवर परिणाम

author img

By

Published : Jul 30, 2020, 5:41 PM IST

अवघ्या दोन दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिसरात विविध ठिकाणी कुर्बानीसाठी लागणारे बोकड बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे बोकड विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी बोकड खरेदीसाठी याठिकाणी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळते. मात्र, यंदा खरेदीसाठी ग्राहक फिरकत नसल्याची खंत विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

corona effect on bakri eid nashik
बकरी ईदवर कोरोनाचे सावट; बकरे विक्रीवर परिणाम

नाशिक - दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदवर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध प्रजातीचे बकरे विक्रीसाठी आलेले आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा बकऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. यामुळे विक्रेते अडचणीत सापडले आहेत.

बकरी ईदवर कोरोनाचे सावट; विक्रीवर परिणाम

अवघ्या दोन दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिसरात विविध ठिकाणी कुर्बानीसाठी लागणारे बोकड बाजारात दाखल झाले आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे बोकड विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी बोकड खरेदीसाठी याठिकाणी मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळते. मात्र, यंदा खरेदीसाठी ग्राहक फिरकत नसल्याची खंत विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - बकऱ्यांना शहरात प्रवेश नसेल तर कुर्बानी कशी होणार, अबू आझमी संतप्त

यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बकऱ्यांची ऑनलाइन पद्धतीनेदेखील खरेदी विक्री होत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदान तसेच मशिदीमध्ये विशेष सामुदायिक नमाज पठण करण्याची परवानगी नसल्यामुळे घरी नमाज पठण करून कुर्बानी देणार असल्याचे मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात येत आहे, तर ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यावर्षीचा ईदचा सण शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना करण्यात आले आहे.

काय आहे बकरी ईद सण -

इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. त्यानुसार कुर्बानीचा उत्सव म्हणून या सणाचे महत्त्व आहे. दरम्यान, ईदच्या दिवशी आपल्याला प्रिय असलेल्या कोणत्याही गोष्टीची अल्लाहसाठी कुर्बानी देण्याची मुस्लिम धर्मात मान्यता आहे. याच, मान्यतेनुसार बकरा कुर्बान करण्याची प्रथा पडली. मात्र, या उत्सवावर देखील यावर्षी कोरोनाचे सावट बघायला मिळत आहे. बकरी ईद सणाच्या दिवशी इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्यांची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालन पोषण करुन त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. मग ईदच्या दिवशी त्याला अल्लाहच्या नावे कुर्बान करण्याची प्रथा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.