ETV Bharat / state

2022 मधील नाशिक महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार - शहराध्यक्ष शरद आहेर - नाशिक महानगरपालिका निवडणूक बातमी

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काँग्रेस कार्यालयात पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी काँग्रेस पक्षाचे आमदार, नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील निवडणुकीत पक्षाचे नुकसान का झाले याची सविस्तर चर्चा करण्यात आली.

congress
congress
author img

By

Published : Dec 26, 2020, 9:41 PM IST

नाशिक - महानगरपालिकेची 2022 ची निवडणूक काँग्रेस स्वबळावर जोमाने लढवणार असून जास्तीत-जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी संघटनेची बांधणी एक वर्ष आधीच सुरू केल्याचे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले.

स्वबळावर लढवणार

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काँग्रेस कार्यालयात पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी काँग्रेस पक्षाचे आमदार, नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील निवडणुकीत पक्षाचे नुकसान का झाले याची सविस्तर चर्चा करण्यात आली. आघाडी धर्म पाळत असताना सहयोगी पक्षाने अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांच्या समोर उमेदवार उभे केल्याची खंत व्यक्त करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार पळवण्याचे काम सहयोगी पक्षाने केले. त्याचा मोठ्या प्रमाणात काँग्रेसला झाला असल्याचे आहेर यांनी सांगत आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा काँग्रेस पक्ष नाशिक शहरात स्वबळावर लढवणार असल्याचे शहराध्यक्ष आहेर यांनी सांगितले. याला सर्वच पद्धधिकाऱ्यांनीं देखील सहमती दर्शवली.

पक्षातील काही नेते पक्षाची हानी करण्याचे काम करत असल्याचे मत कॉग्रेस प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील यांनी बोलून दाखवत संघटना मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.आणि नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली.

महानगरपालिका ठेकेदार चालवतात का?

नाशिक महानगरपालिका ही ठेकेदार चालवतात की काय असा प्रश्न उपस्थित करत आगामी काळात नाशिक महानगरपालिकेतील चुकीच्या कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे केले जाणार असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांनी सांगितले.

पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत राहिल्यास यश हमखास मिळते, याचे ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. मी एका सामान्य कुटुंबात मधून राजकारणाची सुरुवात करून आता आमदार पदावर पोहोचलो आहे.पक्षाचे काम प्रामाणिकपणे व एक निष्ठेने केल्यास मतदार आपल्या पाठीशी उभा राहतो अस मत आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलं.

महिलांसाठी मोठी संधी

आगामी काळामध्ये निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त महिला या काँग्रेस पक्षामध्ये जोडण्यात येणार असून महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्या कारणाने महिलांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात असल्याचे मत महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वत्सलाताई खैरे यांनी आपले मनोगत मांडताना सांगितलं.

यावेळी आमदार हिरामण खोसकाम,आमदार सुधीर तांबे,नाशिक शहर काँग्रेसचे निरीक्षक श्री योगेंद्र पाटिल,शहराध्यक्ष शरद आहेर,डॉ हेमलता पाटील, डॉ सौ शोभा बच्छाव नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे,राहुल दिवे,आशाताई तडवी,राजेंद्र बागुल,हनिफ बशीर,सुरेश मारू, निलेश (बबलू) खैरे, स्वप्नील पाटील,वसंत ठाकूर यांच्या सह कॉग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.