ETV Bharat / state

खड्डा बुजवण्यासाठी विधीवत पूजा करत काँग्रेसचे आंदोलन

खड्डा बुजवण्यासाठी  भूमिपूजनही तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतर अद्याप कुठली ही पावले उचलण्यात आलेली नाहीत. पावसळ्याचे दिवस असल्यामुळे मनपा प्रशासन लोकांचे जीव घेणार  काय? हा प्रश्न नागरीकांमध्ये आहे.

भगदाड बुजवण्यासाठी विधिवत पूजा करत काँग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Jul 16, 2019, 4:38 PM IST

नाशिक - वर्षभरापासून नाशिकरोड मनपा कार्यालयाच्या समोरच मोठा खड्डा पडला आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी काँग्रेसकडून मंगळवारी आंदोलन छेडण्यात आले.

भगदाड बुजवण्यासाठी विधिवत पूजा करत काँग्रेसचे आंदोलन

खड्डा बुजवण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतरही कुठलीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मनपा प्रशासन लोकांचे जीव घेणार काय? हा प्रश्न आंदोलनकर्ते आणि नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे मंगळवारी काँग्रेस नाशिकरोड ब्लॉकच्या वतीने खड्ड्याची विधीवत पूजा करून साखळी उपोषण करण्यात आले.

या आंदोलनाची दखल घेत मनपाच्या वतीने आरोग्य अधिकारी संजय गोसावी यांनी मध्यस्ती करत या आठवड्यात सदर खड्डा बुजवण्याचे काम चालू होईल, असे आश्वासन दिले. यानंतर रोड मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला सूचना देत, काम चालू करण्याचे आदेश दिले.

Intro:गेल्या वर्षभरापासून नाशिकरोड मनपा कार्यालयाच्या समोरच मोठे भगदाड पडले आहे. अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष केलेल्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी कॉंग्रेसकडून आज आंदोलन छेडण्यात आले.Body:भगदाडचे काम सुरु करण्यासाठी भूमिपूजनही तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतर अद्याप कुठलेही पावले उचलण्यात आली नाहीत.पावसळ्याचे दिवस असल्यामुळे मनपा प्रशासन लोकांचे जीव घेणार की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आज काँग्रेस नाशिकरोड ब्लॉकच्या वतीने खड्याची विधिवत पूजा करण्यात आली.Conclusion:साखळी उपोषण करून आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत ना.रोड मनपाच्या वतीने आरोग्य अधिकारी संजय गोसावी यांनी मध्यस्ती करत या आठवड्यात सदर भगदाडाचे काम चालू होईल असे आश्वासन दिले.

यानंतर ना. रोड मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला सूचना देत, काम चालू करण्याचे आदेश दिले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.