ETV Bharat / state

जिल्हाधिकार्‍यांची घोटविहिरा, उंबरमाळ गावाला भेट; दरड कोसळण्याची शक्यता - Collector Visit To Ghotvihira

शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडले आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच, तेथील रहिवाश्यांशी चर्चा करून त्यांचे तत्काळ स्थलांतर करून त्यांना दिलासा दिला आहे.

जिल्हाधिकार्‍यांची घोटविहिरा, उंबरमाळ गावाला भेट

author img

By

Published : Jul 15, 2022, 9:09 PM IST

नाशिक - पेठ तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ येथील शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडले आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच, तेथील रहिवाश्यांशी चर्चा करून त्यांचे तत्काळ स्थलांतर करून त्यांना दिलासा दिला आहे.

दहा कुटुंबांचे केले स्थलांतर - जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी स्थानिकांना भेटून त्यांच्यशी संवाद साधला. या भागात वास्तव्यास असलेल्या दहा कुटुंबांचे घोटविहिरा गावातील रिकामी घरे, समाज मंदिरात व खरपडी आश्रमशाळेत स्थलांतर करताना त्यांची भोजनाची व्यवस्था केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिप आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, तहसीलदार संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वारूळे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व गावातील ग्रामस्थ उपस्थितीत होते.

हेही वाचा - Uddhav Thackeray : शिवसैनिकावर हल्ला, उद्धव ठाकरे संतापले; म्हणाले, 'जीवाशी येत असेल तर खपवून...'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.