ETV Bharat / state

ऐकावं ते नवलंच! कोब्रा जातीच्या सापानं खाल्ला कांदा

सामान्यपणे सापांना बेडूक आणि उंदीर खाताना आपण पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र, बुधवारी मनमाडमध्ये पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाल्ल्याचे निदर्शनास आले.

कांदा बाहेर काढताना साप
author img

By

Published : Oct 9, 2019, 11:50 PM IST

नाशिक - सामान्यपणे सापांना बेडूक आणि उंदीर खाताना आपण पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र, बुधवारी मनमाडमध्ये पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाल्ल्याचे निदर्शनास आले. या कांद्यामुळे त्याचा जीव देखील धोक्यात आला होता. मात्र, सर्पमित्र सलीम शेख आणि विजय उगले यांनी कोब्राचे प्राण वाचवले.

मनमाडमध्ये पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाल्ल्याचे निदर्शनास आले

मनमाड-मालेगाव राज्य महामार्गावर असलेल्या दहेगाव या ठिकाणी पप्पू रांका यांचा कांद्याचा खळा आहे. याठिकाणी नेहमीप्रमाणे कांदे भरण्याचे काम सुरू होते. काम करत असताना कांद्या चाळीच्या लोखंडी जाळीत एक साप अडकल्याचे कामगार महिलांच्या लक्षात आले. तत्काळ सर्पमित्र सलीम शेख आणि विजय उगले यांना फोन केला. शेख व उगले यांनी हा अत्यंत विषारी साप असल्याचे सांगितले. कोब्रा सापाने काहीतरी खाल्ल्याने त्याला चालता येत नव्हते. तसेच जाळीच्या तारेमुळे त्याला जखम देखील झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन्ही सर्पमित्रांनी कोब्राला व्यवस्थित बाहेर काढले.

हेही वाचा - जात प्रमाणपत्र वैधतेसाठी आमदार चव्हाण अडचणीत

सापाने गिळलेला कांदा बाहेर काढला असून कोब्रा सापाला जंगलात सोडल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी सय्यद यांनी दिली. सय्यद यांनी सर्पमित्र शेख आणि उगले यांचे आभार मानले.

Intro:साप म्हटले की बेडूक उंदीर किंवा छोटे साप खातांना आपण नेहमी बघितले किंवा ऐकले असेल मात्र आज मनमाड शहरात पकडण्यात आलेल्या भारतीय कोब्रा जातीच्या सापाने चक्क कांदा खाला असल्याचे निदर्शनास आले आणि त्या कांद्यामुळे त्याचा जिव देखील धोक्यात आला होता मात्र सर्पमित्र सलीम शेख व विजय उगले यांनी त्याचे प्राण वाचविलेBody:याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड मालेगाव राज्य महामार्गावर असलेल्या दहेगाव या ठिकाणी पप्पू रांका यांचा कांद्याचा खळा आहे.याठिकाणी नेहमी प्रमाणे कांदे भरायचं काम चालू होते काम करत असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास कांद्याच्या चाळीच्या लोखंडी जाळीत एक भला मोठा भारतीय कोब्रा जातीचा साप अडकल्याचे कामगार महिलांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ सर्पमित्र सलीम शेख व विजय उगले यांना फोन केला शेख व उगले यांनी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली असता हा अत्यंत विषारी साप असल्याचे सांगितले तसेच त्याला काही तरी खाल्याने चालता येत नाही व त्याला तारेमुळे जखम देखील झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्यास इजा न होता व्यवस्थित बाहेर काढले व त्याच्या पोटातील खाल्लेली वस्तू बाहेर काढली व वनविभागाच्या सय्यद यांना माहिती दिली
सय्यद यांनी भेट देत पाहणी केली व त्या कोब्रा जातीच्या सापाची नोंद करून घेत त्यास जंगलात सोडले तर सर्पमित्र शेख व उगले यांचे आभार मानले .Conclusion:साप हा बेडूक उंदीर किंवा छोटे साप खातो मात्र आजच्या या सापाने जेव्हा पोटातील अन्न बाहेर फेकले तेव्हा बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले कारण त्या कोब्राणे चक्क कांदा गिळला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.सध्या कांद्याला जास्त भाव असल्याने कोब्रा देखील महाग वस्तू खात असल्याची चर्चा खळ्यातील महिला व पुरुष कामगार हास्यवारी करत होते.तसेच त्यांनी देखील सर्पमित्र शेख व उगले यांचे आभार मानले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.