ETV Bharat / state

CM on Governor Controversial Statement : लवकरच मालेगाव जिल्हा होणार, राज्यपालांच्या मताशी असहमत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - CM on Governor Controversial Statement

मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसाचा खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही असहमत आहोत. राज्यपालांनी कोणाची मने दुखवू नये अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथे पत्रकारांशी बोलताना ( CM on Governor Controversial Statement ) व्यक्त केली. तसेच लवकरच मालेगाव जिल्हा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

CM on Governor Controversial Statement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 30, 2022, 4:40 PM IST

नाशिक/मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुंबई आणि मराठी माणसांबाबत केलेले वक्तव्य आक्षेपार्ह ( Governor controversial statement ) असून त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबई आणि महाराष्ट्राच्या उभारणीमधील मराठी माणसाचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे बरोबर नाही मात्र राज्यपालांनी त्यांच्या वक्तव्याबाबत खुलासाही केलेला आहे त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुलासा केलेला आहे अशी सारवासारवही शिंदे यांनी केली. मुंबईचा योगदानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचाही मोठा वाटा आहे हे कुणीही विसरू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - Uddhav Thackeray : 'ते पार्सल मराठी माणसाचा अपमान करत असेल तर....'; राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरुन उद्धव ठाकरे कडाडले

नाशिकच्या विभागासाठी जलद योजना राबवणार - नाशिक विभागीय आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव येथील क्रीडा संकुलात पार पडली या बैठकीनंतर पत्रकारांची बोलताना त्यांनी सांगितले की या बैठकीमध्ये नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी सर्व छोट्या कामांच्या रखडलेल्या प्रकल्पांना त्वरित मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. रस्ते वीज आणि पाणी या पायाभूत सुविधांवर आमचा भर असून या भागातील या सुविधा लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील तसेच काही महत्त्वाचे रखडलेले प्रकल्प आहे त्यांनाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन पूर्ण करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रातून कोश्यारी यांची हकालपट्टी झालीच पाहिजे; संभाजी ब्रिगेडची मागणी

मालेगाव जिल्हा करण्याबाबत विचार - मालेगाव हा वेगळा जिल्हा स्थापन व्हावा अशी मागणी स्थानिक आमदार दादा भुसे तसेच अन्य काही आमदारांनी केली आहे. मात्र देवळा येथील आमदारांचा या मागणीला विरोध असून अन्य काही आमदारांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याबाबतचा धोरणात्मक निर्णय येईल लवकरच घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - Prakash Ambedkar On Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचे प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.