असे झाले महामार्गाचे काम : दरम्यान नागपूर ते शिर्डीदरम्यान असलेला महामार्ग हा पहिला टप्पा होता. आता दुसऱ्या टप्प्यात नाशिकमधील भरवीरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी ते राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील महामार्गाचे अंतर हे 701 किमी आहे. या महामार्गातील आधी नागपूर ते शिर्डीमधील 501 किलोमीटरचा महामार्ग पूर्ण करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित टप्प्याचे काम सुरू होते, त्यापैकी आता शिर्डी ते भरवीरपर्यंतचे 80 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. हा समृद्धी महामार्गचा दुसरा टप्पा आहे. हे काम पूर्ण झाल्याने भरवीर ते नागपूरचे अंतर अवघ्या 6 तासात पूर्ण करता येणार आहे.
600 किलोमीटरचे काम पूर्ण : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा प्रकल्प 55 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे. देशातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नाशिक या शहरी क्षेत्रातून जाणारा आहे. दरम्यान या महामार्गामुळे 24 जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते. नागूपर ते शिर्डी दरम्यानचा पहिला टप्पा हा 520 किलोमीटर लांबीचा आहे. आता शिर्डी ते भरवीरपर्यंतचा हा दुसरा टप्पा हे अंतर साधरण 80 किलोमीटरचे आहे. पण नागपूर ते भरवीर पर्यंतचे अंतर आपण मोजले तर आतापर्यंत या महामार्गाचे 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
समृद्धी महामार्ग मुंबईला कधी भेटणार : शिर्डी - भिवंडी दरम्यानच्या महामार्गाचे काम अजूनही सुरू आहे. या कामाला वेळ लागत आहे. या कामाला उशीर लागण्यामागचे कारण म्हणजे सिन्नर ते कसारा दरम्यानच्या भागात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा अखेरचा टप्पा असेल. हा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार आहे. हा टप्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना या महामार्गाचा पूर्ण उपयोग घेता येईल. दरम्यान येणाऱ्या लोकसभेच्या आधी या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने हाती घेतले आहे
हेही वाचा -