नाशिक - बारावीच्या परीक्षेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी 3 मार्च पासून दहावीच्या लेखी परीक्षेस सुरुवात होत आहेत. नाशिक विभागातून 2 लाख 16 हजार 375 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत. मागीच्या वर्षी नाशिक विभागातून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांना सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आली होती. यावर्षी गैरप्रकाराची शक्यता असलेल्या केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. परीक्षेतील गैरप्रकारावर नजर ठेवण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
शिक्षण मंडळातर्फे परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून शहरातील विविध महाविद्यालयात आसन व्यवस्थाही निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवणात दहावीच्या परीक्षेला विशेष महत्व आहे, परीक्षा तणाव मुक्त आणि गैरप्रकार मुक्त पार पाडावी यासाठी शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रम राबवले गेले आहेत. मागच्या वर्षी नाशिक विभागातून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांना सर्वाधिक कॉपीची प्रकरण समोर आली होती. यावर्षी गैरप्रकाराची शक्यता असलेल्या केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 3 मार्च दुपारी तीन वाजता सकाळी 11 ते 2 या वेळेत प्रथम सत्रात भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, पंजाबी तर दुसऱ्या सत्रात दुपारी तीन ते सहा या वेळेत जर्मन आणि फ्रेंच या विषयांची परीक्षा होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा निहाय प्रविष्ट विद्यथ्यांची माहिती | जिल्हा प्रविष्ट विद्यार्थी एकूण केंद्र | |
नाशिक | 97912 | 95 |
धुळे | 31835 | 44 |
जळगांव | 64050 | 71 |
नंदुरबार | 22587 | 24 |