येवला - येवला उपजिल्हा रुग्णालय येथे आज शनिवार रोजी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवल्याचे चित्र रुग्णालयात आज दिसून आले. प्रशासन वेळोवेळी सांगत असून देखील सुद्धा नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत नाहीत.
येवल्यात एकूण 2999 कोरोना बाधीत आहेत संख्या पोहचली असून आता पर्यंत कोरोनावर 2390 जणांनी मात करत घरवापसी केली आहे. तर आतापर्यंत 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शनिवार रोजी कोरोनाने 66 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सध्या उर्वरित 491 जण उपचार घेत आहेत.
हेही वाचा- कोरोनाच्या कठीण काळात तरी केंद्र सरकारने राजकारण बाजूला ठेवावे; एकनाथ खडसे यांनी साधला निशाणा