ETV Bharat / state

राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने राज्यात आणू - नरहरी झिरवाळ - नरहरी झिरवाळ न्यूज

नाशिक जिल्ह्यातील काही कामगार कामानिमित्त बाहेर गेले आहेत. ज्या कामगारांना जिल्ह्यात आपल्या घरी यायचे आहे, अशा कामगारांनी स्थानिक प्रशासनाशी किंवा 9422769444 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

Narhari zirwal
राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने राज्यात आणू
author img

By

Published : May 2, 2020, 7:10 PM IST

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कामगार, विद्यार्थी, व्यावयायिक दुसऱ्या राज्यात तसेच आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात अडकले आहे. या सर्वांकडून आपापल्या घरी जाण्याची मागणी होत आहे. नाशिक जिल्ह्यातीलही काही कामगार कामानिमित्त बाहेर गेले आहेत. ज्या कामगारांना जिल्ह्यात आपल्या घरी यायचे आहे, अशा कामगारांनी स्थानिक प्रशासनाशी किंवा 9422769444 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

झिरवाळ यांनी दिंडोरी तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवून, आरोग्य केंद्राची माहीती घेतली. तसेच प्रत्येक गावात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे, ज्या-ज्या गावातील नागरिक कामानिमीत्ताने तालुका किंवा जिल्हा, किंवा राज्याबाहेर गेले असतील त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्याबाहेर अडकलेल्यांनाही संपर्क करावा त्यांना शासनाच्या वतीने महाराष्ट्रात आणूत तसेच महाराष्ट्रात अडकलेल्या इतर नागरिकांनाही बाहेर त्यांच्या राज्यात पाठवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नरहरी झिरवाळ म्हणाले.

मास्कचे वाटप करताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

दिंडोरी तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवानिवृत्ती सैनिकांच्या वतीने डॉक्टर व आशा सेविका यांना मास्कचे वाटप नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडोरी तालुका आदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्यातील वारे, टिटवे, वनारे, भनवड या गावातील आदिवासी महिला बचत गटाने घरच्या घरी शिलाई मशिनवर १oo टक्के कॉटनचे माक्स तयार केले आहे. तयार केलेले सर्व मास्क आमदार नरहरी झिरवाळ यांच्या घरी आणून दिल्यानंतर त्यांनी ते ते माक्स डॉ. लक्ष्मण साबळे व डॉ. वाघ यांच्याकडे सुपुर्द केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.