ETV Bharat / state

बालकांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल - नाशिक न्यूज अपडेट

इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.

बालकांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल

author img

By

Published : Jun 9, 2021, 6:27 PM IST

नाशिक - इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने भारतामध्ये सर्वप्रकारच्या पॉर्न व्हिडिओ साइट्सवर बंदी घातली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हाट्सअप या सोशल मिडीया ऍपवर लहान बालकांचे अश्लील व्हिडिओ अपलोड करण्यात आले असल्याची माहिती संबंधित कंपन्यांकडून केंद्र शासनाला देण्यात आली होती. दरम्यान यामध्ये केंद्र आणि महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाने तपास केला असता, नाशिकमधून हे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील दोन सोशल मिडीया अकांऊटवरून हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बालकांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल

व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांसह बघणाऱ्यांवर देखील होणार गुन्हे दाखल?

सायबर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित संशयित प्रोफाईल धारकांविरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कोरबु यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक सायबर पोलीस करत असून, हा व्हिडिओ बघणाऱ्या 80 जणांची नावे देखील महाराष्ट्र सायबर विभागाच्या तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सर्वात विश्वासू खासगी सचिव राम खांडेकर यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.