ETV Bharat / state

" नूतन वर्षात सर्वांनावर मोठी जबाबदारी, सगळं सकारात्मक घडो हीच अपेक्षा" - छगन भुजबळ बातमी

नवीन वर्षाच्या स्वागत करतानाच आपल्यावर आता मोठी जबाबदारी आहे. आपण हे नवीन वर्ष आपल्या घरात कुटूंबियांसोबतच साजरे करूया. एकमेकांना शुभेच्छा देऊया की कोरोनाचे संकट लवकर दूर होवोत

Bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Jan 1, 2021, 12:28 PM IST

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे आपल्या सर्वांनाचे हे वर्ष अतिशय खडतर गेले आहे. पण आता आपण २०२० ला निरोप देऊन २०२१ चे स्वागत करत आहोत. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात सर्व सकारात्मक घडो अशी अपेक्षा करत, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नवीन वर्षाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरनाचे वर्ष

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना भुजबळ म्हणाले की,नवीन वर्षाची सुरवात होत असताना आपण मागच्या वर्षा मध्ये नेमकं काय घडलं आणि ते वर्ष कसे गेले याचा मागोवा घेत असतो. पण मागच्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीने सर्वांनाच वेठीला धरले. यात कोरोडो लोकांना कोरोनाची लागण झाली. काही लाख लोक मृत्यमुखी पडले, तर काही लाख लोकांना कोरोना नंतरच्या आजारांना, विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. पण अशा संकटात देखील डॉक्टर,प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून जनतेची सेवा केली आणि अनेक लोकांना या आजारातून वाचवले.

कोरोना काळात नाशिकमध्ये चांगली व्यवस्था
नाशिक जिल्ह्यातील कोरोना संकटावर बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात सुद्धा सुरवातीला कोरोनाचे रुग्ण नव्हते. पण नंतर मालेगाव आणि नाशिकमध्ये याचा प्रादुर्भाव वाढला. त्यावेळी नाशिकमध्ये प्रशासकीय यंत्रणांनी मोठे कष्ट घेतले. अगदी जीव धोक्यात घालून लोकांना या आजारातून वाचवण्यासाठी मदत केली. नाशिकमध्ये कोरोनाचे आकडे वाढत असताना आपण चांगली व्यवस्था उभी केली. यात सर्व हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली. ठक्कर डोम मध्ये कोविड सेंटर उभारले. ऑक्सिजन,औषधे यांची व्यवस्था केली. आणि कोरोना बरोबर मोठा लढा दिला. ह्या सर्व सेंटरमध्ये बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा आहे. आपली सर्व यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

नव्या वर्षात सर्वांवर मोठी जबाबदारी

यावेळी कोरोनाच्या या संकटात अनेकांनी आपले जीव गमावले त्याबद्दल छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भुजबळ यांनी नवीन वर्षाच्या स्वागत करतानाच आपल्यावर आता मोठी जबाबदारी आहे. आपण हे नवीन वर्ष आपल्या घरात कुटूंबियांसोबतच साजरे करूया. एकमेकांना शुभेच्छा देऊया की कोरोनाचे संकट लवकर दूर होवोत.

हेही वाचा- कोरोना विजयी : न घाबरता केली कोरोनावर मात, दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.