ETV Bharat / state

मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक हरपला : छगन भुजबळ यांनी व्यक्त केला शोक - विद्यार्थ्यांना आधार देण्याचे केले काम

प्रसिद्ध लेखक, कवी आणि वंचितांची, शोषितांची बाजू अव्याहतपणे मांडणारे थोर साहित्यिक नागनाथ कोतापल्ले ( Death of Famous Writer Nagnath Kotapalle ) यांचे आज निधन झाले. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त करीत साहित्यातील बलदंड व्यक्तिमत्त्व आणि मानवतावाद जपणारा ( Astounding journey of Nagnath Kotapalle ) कृतिशील लेखक हरपला अशी शोकभावना ( Bhujbal Expressed Grief Death of Kotapalle ) व्यक्त केली.

Death of Famous Writer and Literary Great Nagnath Kotapalle
मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक हरपला
author img

By

Published : Nov 30, 2022, 6:21 PM IST

नाशिक : लेखन प्रपंच आणि कृतिशीलतेमुळे ओळखले जाणारे बलदंड व्यक्तिमत्त्व, तसेच साहित्यिकांच्या कोणत्याही वर्तुळात किंवा एखाद्या पंथांच्या चौकटीत न रमणारे ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले ( Death of Famous Writer Nagnath Kotapalle ) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक हरपला ( Astounding journey of Nagnath Kotapalle ) असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ( Bhujbal Expressed Grief Death of Kotapalle ) व्यक्त केल्या आहेत.

थक्क करणारा प्रवास : छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांनी चार दशके प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रासाठी वाहून दिली. दलित, ग्रामीण विद्यार्थ्यांशी अतिशय आत्मियतेचे नाते असणारे ते गुरुजी होते. मराठीचे अध्यापक, विभागप्रमुख ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि ८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

अनेक विद्यार्थ्यांना आधार देण्यापासून ते जीवनात उभे करण्यापर्यंत केले मोलाचे कार्य : संयमी असले तरी कोत्तापल्ले यांचा बाणा मात्र करारीच होता. अनेक विद्यार्थ्यांना आधार देण्यापासून ते त्यांना जीवनात उभे करण्यापर्यंत मोलाचे कार्य आणि नैतिक जबाबदारी पार पाडली हे त्यांचे माणूसपणाचे संचित वेगळा आदर्श निर्माण करणारे ठरले. कोत्तापल्ले यांच्या साहित्याला फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्‍स यांच्या विचारांचे तात्विक अधिष्ठान होते. कोत्तापल्ले यांनी महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्याचा वेध घेतला. महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी विचार आणि प्रबोधन परंपरा त्यांनी मांडली. त्यांच्या निधनाने परिवर्तनाच्या चळवळीला वैचारिक दिशादिग्दर्शन करणारा साहित्यिक देशाने कायमचा गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

प्रसिद्ध लेखक कोतापल्ले यांच्या लेखना साहित्याबाबत : कोत्तापल्ले सर ज्या काळात लेखन करीत होते, त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन वातावरणाचा मोठा परिणाम त्यांच्या लेखनावर झाला. त्यांच्या साहित्याला फुले – शाहू – आंबेडकर – मार्क्‍स यांच्या विचारांचे तात्विक अधिष्ठान आहे. कविता, कथा, कादंबरी, ललित, वैचारिक, समीक्षा, अनुवाद, संपादन अशा सर्वच क्षेत्रात त्यांच्या लेखणीने संचार केला आहे. हाताळलेल्या सर्वच वाङ्मय प्रकारांत त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. समाजजीवन समजावून घेऊन त्यांनी साहित्य निर्माण केले.

लेखक म्हणून त्यांची भूमिका मानवतावादी : मानव्याची प्रतिष्ठापना हा त्यांच्या साहित्य निर्मितीमागील हेतू आहे. सामाजिक बांधिलकीची भूमिका आणि सामाजिक भोवतालातील संघर्षांतच त्यांच्या लेखनाची बीजं दडलेली आहेत. चळवळीतील प्रत्यक्ष सहभाग त्यांच्या साहित्यनिर्मितीला कारणीभूत ठरला. एक लेखक म्हणून त्यांनी राजकीय भूमिका घेतली.

समाजातल्या शोषितांच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा लेखक : एका विशिष्ट जगाची बाजू घेणे म्हणजे राजकीय भूमिका घेणे होय. शत्रू कोण याविषयीचे एक स्पष्ट भान या भूमिकेमागे असते. ‘मी समाजातल्या शोषितांच्या बाजूचा आहे. समाजातील दलित, ग्रामीण, पीडित, शोषित जे कोणी असतील ते मला जवळचे आहेत. त्यांची तीच बाजू मला जवळची वाटते,’ असे स्पष्ट प्रतिपादन कोत्तापल्ले यांनी केले आहे. त्यांच्या साहित्याचा संदर्भ एकूण समाजव्यवस्थेशी, जीवन व्यवस्थेतील ताणतणावाशी आहे. त्याचे मूळ त्यांच्या राजकीय भूमिकेत आहे. या भूमिकेमुळेच त्यांच्या साहित्याला सघनता प्राप्त झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.