नाशिक - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हेच झारीतील शुक्राचार्य असून यांना डिसेंबर 2022 पर्यंत ओबीसी आरक्षण द्यायचं नाही, असा गंभीर आरोप माजी उर्जामंत्री तथा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी महाविकास आघाडीतील झारीतील शुक्राचार्य हे अडसर ठरत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ओबीसी आरक्षणात केंद्राचा कोणताही संबंध येत नसून राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील हा विषय असल्याचे म्हणाले.
ओबीसी डेटात 69 लाख चुका
वसंतस्मृती कार्यालयात मंगळवारी ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसी आयोग त्यांनी तयार केला मात्र अजूनही कामकाज सुरू केले नाही. यांना आरक्षण द्यायचे नाही. पण आम्ही निवडणूक घेऊ देणार नाही. विजय वडेट्टीवार बोलतात. छगन भुजबळ मोर्चे काढतात. मात्र मुख्यमंत्री आणि शरद पवार बोलत नाही. छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा, भाजप त्यांना नक्की मदत करणार.ओबीसी डेटात 69 लाख चुका असून नव्यानं डेटा तयार करावा. यात केंद्राचा कोणताही संबंध येत नाही. हे राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातील डेटात 69 लाख चुका आहेत. राज्यात व देशात ओबीसी नेत्यांना, सगळ्यात जास्त भाजपाने् प्रतिनिधित्व दिल्याचा दावा, यावेळी बावनकुळे यांनी केला आहे.
25 लाख युवक वॉरियर्सची नोंदणी करणार
25 लाख युवक वॉरियर्सची नोंदणी भारतीय जनता पक्ष करणार असुन राज्यातील युवकांपुढे अनेक गंभीर समस्या आहे. ही युवा शक्ती एकत्र करुन त्यांचे प्रश्न समजून घेणार. डिसेंबर 21 अखेर युवा वॉरियर्सला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बांधणी करणार आणि केंद्र सरकारच्या युवकांसाठी असलेल्या योजना युवकांपर्यंत पोहचवून त्यांना स्वावलंबी करणार. उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात आठवडाभर भाजपा आणि युवा मोर्चाचं अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीला 22 डिसेंबर पर्यंत ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही
महाविकास आघाडीला 22 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही, यासाठी ही चालढकल चाललेली आहे, असे सांगून ते म्हणाले की जर आरक्षण मिळाले नाही तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की आरक्षणावर वडेट्टीवार बोलतात छगन भुजबळ मोर्चे काढत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार बनविणारे शरद पवार का बोलत नाही? असा प्रश्न उपस्थित करून बावनकुळे पुढे म्हणाले, की यातील कोणीतरी झारीतील शुक्राचार्य आहे. ते कोण हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योती त्याची निश्चित गरज नाही, असे सांगून ते म्हणाले की शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच ओबीसींना आरक्षण मिळत नसल्याचा आरोप केला. ते पुढे म्हणाले, की फक्त ओबीसी आयोग तयार करण्यात आला आहे. मात्र त्याचे कामकाज सुरू होऊ दिले जात नाही. त्यासाठी कोण आहे यामध्ये केंद्र सरकारचा कोणताही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात जो डाटा तयार करण्यात आला तो मुळात चुकीचा आहे. त्यामुळे अनेक चुका झालेल्या आहेत. असे सांगून ते म्हणाले की राज्य मध्ये सर्वात जास्त ओबीसी नेत्यांना भाजपाने प्रतिनिधित्व दिले असल्याचे बावनकुळे यानी सांगितले आहे.
पंकजा मुंडे नाराज नहीत
मुंबई येथील ओबीसी बैठकीत बावनकुळे व पंकजा मुंडे हजर नव्हते. ते नाराज असल्याची चर्चा आहे, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले, की पंकजा मुंडे नाराज नहीत. त्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गेल्या नाहीत. मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याने जाऊ शकलो नाही. मुंबईत भाजपा ओबीसी सेलची एक छोटी बैठक होती असेही त्यांनी सांगितले.