ETV Bharat / state

जिल्ह्यात लाखों रुपयांच्या चंदनाची कत्तल, वेळेत कारवाई न झाल्याने वन विभाग वादाच्या भोवऱ्यात

वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत गेल्या २५ ते ३० वर्षांचे चंदनाचे डेरेदार वृक्ष तस्करांनी कत्तल करून चोरून नेले. या वृक्षांची अंदाजे किंमत बाजारात १० ते १२ लाख रुपये आहे. ही तस्करी होऊन आज ८ ते १० दिवस होऊनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने वन विभागाची यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

चंदन
चंदन
author img

By

Published : Mar 16, 2020, 9:46 AM IST

नाशिक - बागलाण तालुक्यात सागवान झाडांच्या तस्करी पाठोपाठच चंदन तस्करांची टोळी सक्रिय झाल्याने ही मौल्यवान वनसंपदा धोक्यात आली आहे. वन विभागाच्या साल्हेर येथील २४ तास पहारेकरी असलेल्या निसर्ग परिचय केंद्रालगत गेल्या २५ ते ३० वर्षांची जुनी १० ते १२ लाख रुपये किमतीची चंदनाची डेरेदार वृक्ष तस्करांनी कत्तल करून चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बागलाण तालुक्यातील वन संपदा आणि वनक्षेत्रात चालणारी शासकीय कामे ठेकेदार, तस्कर व वन यंत्रणा या त्रिकुटासाठी सध्या कुरण असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी प्रसिद्ध डाबखलच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागाची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर वन विभाग खडबडून जागा होऊन ५ तस्करांना बेड्या ठोकल्या होत्या. ही घटना ताजी असतांनाच वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत गेल्या २५ ते ३० वर्षांचे चंदनाचे डेरेदार वृक्ष तस्करांनी कत्तल करून चोरून नेले. या वृक्षांची अंदाजे किंमत बाजारात १० ते १२ लाख रुपये आहे. ही तक्सरी होऊन आज ८ ते १० दिवस होऊनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने वन विभागाची यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हेही वाचा - कोरोनाचा आठवडी बाजराला फटका, मनमाडला ग्राहकांनी फिरवली पाठ

वास्तविक घटना घडल्यानंतर तत्काळ पंचनामा करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतु झाडे चोरी होऊन ८ ते १० दिवस उलटून कोणतीही कारवाई न झाल्याने तस्कर आणि वन यंत्रणा यांची अभद्र युती याच्या पाठीमागे काम करत असल्याचे बोलले जात आहे. याठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या झाडाची किंमत सुमारे एक ते दीड कोटीच्या घरात आहे.

गेल्या काही वर्षापासून आयुर्वेदाकडे सर्वांचा कल वाढत आहे. गुणकारी आणि साईड इफेक्ट नसल्यामुळे आयुर्वेदाला पसंती मिळत आहे. ही बाब विचारात घेऊन औषधे तयार करण्यासाठी अन्य वनौषधींबरोबरच चंदनालाही आयुर्वेदिक कंपन्यांकडून प्रचंड मागणी असल्याचे सेवानिवृत्त वनाधिकारी बी.एस.जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - नाशकात शासन निर्णय झुगारून नाटकांचे प्रयोग सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.