ETV Bharat / state

'मराठा समाज ओबीसींच्या 17 टक्क्यांत आला तर त्यांना काहीच मिळणार नाही'

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी करा अशी मागणी आम्ही पवार साहेबांकडे केली होती. पवार यांनी त्याला तत्काळ मान्यता दिली.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : Nov 30, 2020, 4:36 PM IST

Updated : Nov 30, 2020, 5:01 PM IST

नाशिक - मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. मराठा समाज ओबीसींच्या 17 टक्क्यात आला तर त्यांना काहीच मिळणार नाही. मराठा समाजाच्या नेत्यांचीदेखील ओबीसीमधून आम्हाला आरक्षण नको, अशी मागणी असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. ते भुजबळ फार्म निवासस्थानी बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की ओबीसींना आरक्षण मिळावे, यासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी करा अशी मागणी आम्ही पवार साहेबांकडे केली होती. पवार यांनी त्याला तत्काळ मान्यता दिली. गायकवाड आयोगाने शिक्षणात आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी शिफारस केली आहे.

हेही वाचा-...तर लढण्यासाठी पुन्हा एकत्र यावं लागेल - छगन भुजबळ

काही लोक निव्वळ द्वेषाचे राजकारण करत आहेत का...?

पुढे भुजबळ म्हणाले, की मराठा समाजाच्या नेत्यांनी दखील ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या, अशी मागणी आहे. मात्र, काही लोक निव्वळ द्वेषाचे राजकारण करत आहेत का ? याची माहिती घ्यावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारमध्ये दरवर्षी 3 टक्के लोक रिटायर होतात. भरती करायची नाही तर लोक कामाला कुठून मिळणार? ओपनमधूनसुद्धा मराठा समाज येतो. त्यामुळे सगळ्यांच्या आड येण्याचे कारण काय? तुम्हाला आरक्षण हवे म्हणून बाकीच्यांवर अन्याय का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा-राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा - गोपीचंद पडळकर

मराठा आरक्षण विषय भरकटत चालला?आता सगळे भरकटायला लागले आहे. ओबीसी आरक्षणावर गदा येत असेल तर बोलणारच असे सांगत त्यांनी ओबीसी मोर्चाचे समर्थन केले. तसेच मोदींनी दहा टक्के इबीसीला आरक्षण दिले. मग, मराठा समाजाला आरक्षण द्यायला लावा. राज्यात 5 वर्षे सत्ता होती. मग तुम्ही का नाही दिले? असा जाब पालकमंत्री भुजबळ यांनी भाजपला विचारला.छगन भुजबळांनी नुकतेच दिला होता इशारा-

नुकतेच छगन भुजबळ यांनी ओबीसी मोर्चाला समर्थन दिले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. आम्ही सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मात्र, काही जण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असून ही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले होते.

Last Updated : Nov 30, 2020, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.