ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर मनसेचा जल्लोष, त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांसाठी झाले खुले! - mns celebrates infront of trimbakeshwar temple

त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर मनसेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे पुरोहित यांनी मंदिर सुरू करण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मंदिर उघडण्याच्या कामाला गती मिळाली आणि राज्यभरातली मंदिरे उघडली गेली, अशी भावना व्यक्त करत मनसेच्यावतीने मंदिराच्यासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला आहे.

nashik trimbakeshwar temple opened
मनसेच्यावतीने त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आनंदोत्सव
author img

By

Published : Nov 16, 2020, 2:45 PM IST

नाशिक - त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर मनसेच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे पुरोहित यांनी मंदिरे सुरू करण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मंदिरे उघडण्याच्या कामाला गती मिळाली आणि राज्यभरातली मंदिर उघडली गेली, अशी भावना व्यक्त करत मनसेच्या वतीने मंदिराच्या समोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला आहे.

मनसेच्यावतीने त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आनंदोत्सव

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याची घोषणा केल्यानंतर आज तब्बल आठ महिन्यानंतर राज्यातील सर्वच मंदिरे उघडण्यात आली आहेत. नाशिसह भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिरदेखील भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भल्यापहाटे मुख्य दरवाजा उघडण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून भाविक मंदिरात दाखल झाले. तर मंदिर सुरू झाल्यामुळे पहाटे त्र्यंबकेश्वरच्या मंदिराबाहेर शिवभक्तांनी फटाके फोडून जोरदार जल्लोष देखील केला.

हेही वाचा - अयोध्येत अन्नकूट महोत्सव साजरा, श्रीरामांना 56 प्रकारचा नैवेद्य

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.