नाशिक: एक जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मुंडेगाव येथील कंपनीला आग लागून 22 कामगार जखमी झाले होते. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू व जाळपोळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी बुधवारी सांगितले की, त्यांनी सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व फायर-हिट सुविधेशी संबंधित आहेत आणि युनिटमध्ये वेगवेगळ्या पदांवर आहेत.
गुन्हा केला दाखल: तपासणी आणि दुरुस्तीनंतर प्लांट सुरू करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पाळली गेली नसल्यामुळे, युनिटमधून थर्मिक फ्लुइड ऑइल लीक झाले. ज्यामुळे आग लागली. यामध्ये वापरकर्ता (मालक), कारखाना व्यवस्थापक, पॉली फिल्म प्लांट बिझनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेंटेनन्स डिपार्टमेंट हेड, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इनचार्ज आणि प्लांट ऑपरेटर असे सात जण या तीन कामगारांच्या मृत्यूला जबाबदार होते. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत होणे), 337 (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे) आणि 338 (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृतीमुळे गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे पोलीसांनी सांगितले.
नागरिकांना मास्कसक्ती केली: इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीत तब्बल तीन दिवसानंतर एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आले होते. सुधीर मिश्रा असे मृतदेह आढळून आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. जिंदाल कंपनीत काम करणारे सर्व कामगार परप्रांतीय असल्याने अजूनही काही कामगार बेपत्ता असल्याचा स्थानिक गावकऱ्यांना संशय व्यक्त केला होता. दरम्यान आग विझली असली तरी धुराचे लोट कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्कसक्ती केली होती.
कशी झाली घटना इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत 1 जानेवारीला सकाळी 11.20 वाजता बॉयलरचा स्फोट झाला होता. यावेळी लागलेल्या आगीत 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींवर उपचाराचा खर्च शासन करणार करेल आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
लाऊड स्पीकर मार्फत सूचना जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 1 जानेवारी 2022 लागलेल्या आगीनंतर अद्याप धुराचे लोळ कमी झाले नाहीत. त्यामुळे वातावरणात विषारी वायू तयार होण्याची शक्यता असून या परिसरातील नागरिकांनी मास्क वापरावे, अंगभर कपडे घालावे जेणे करून या धुराचा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा प्रकारच्या सूचना 25 गावांमध्ये दिल्या होते. यासाठी प्रशासनाच्या वतीने गावागावात रिक्षावर लाऊड स्पीकर लावून सूचना दिल्या होत्या
.
हेही वाचा: Nashik Factory Fire नाशिक जिंदाल कंपनी आग प्रकरण आणखी एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला