ETV Bharat / state

सोशल मीडियावर कोरोनाबाधित व्यक्तींबाबत पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी दिंडोरीत तिघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला संसर्ग झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या दिंडोरी तालुक्यातील व्यक्तींची तपासणी करण्याबाबत देण्यात आलेला शासकीय मेसेज कुणाकडून तरी मिळवत व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमीन संतोष लोखंडे, ननाशी येथील आप्पा शिंगाडे व पेठ येथील संतोष डोमे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपचा टाकल्याने सर्वत्र अफवा पसरली.

Dindori Police
दिंडोरी पोलीस
author img

By

Published : May 5, 2020, 11:02 AM IST

नाशिक - कोरोनाबाधित व्यक्तीबाबतची माहिती आणि उपाययोजनां संदर्भातील शासकीय मेसेज व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याबद्दल दिंडोरी व पेठ तालुक्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला संसर्ग झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या दिंडोरी तालुक्यातील व्यक्तींची तपासणी करण्याबाबत देण्यात आलेला शासकीय मेसेज कुणाकडून तरी मिळवत व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमीन संतोष लोखंडे, ननाशी येथील आप्पा शिंगाडे व पेठ येथील संतोष डोमे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपचा टाकल्याने सर्वत्र अफवा पसरली. सदर व्यक्तींबद्दल ग्रामस्थांमध्ये गैरसमज होऊन त्यांचे दैनंदिन जीवनात अडचणीत सापडले. त्यामुळे सदर मेसेज टाकणाऱ्या तिघांविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णासंदर्भात कुणीही कोणतीही पोस्ट सोशल मीडियात टाकू नये. कोणतीही अफवा पसरवू नये. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.