नाशिक - डॉक्टर असल्याचे बनावट प्रमाणपत्र देत बजाज फायनान्स कंपनीला 40 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकारणी बजाज फायनान्स कंपनीचे अधिकारी सुमित कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसात फायनान्स शाखा व्यवस्थापकासह दोघा बोगस डॉक्टरां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित कांबळे यांच्या तक्रारीवरून संशयित गंगापूर रोड येथील बजाज फायनान्स शाखा अधिकरी किरण कांबळे आणि संशयित श्रीराम नेरपगार (रा. तारवलाणावर, नाशिक), योगेश केदारे (रा. पाथर्डी फाटा) या तिघांनी संगनमत करत संशयित कांबळे याने दोघांच्या नावे बिडीडीएस व एमडीएस डॉक्टर असल्याचे बोगस प्रमाणपत्र बनवत दोघांच्या नावे वैद्यकीय कर्ज मंजूर केले. नेरपगारच्या नावे 19 लाख 49 हजार तर केदारेच्या नावे 20 लाख 42 हजाराचे कर्ज मंजूर करत धनादेश युनियन बँक व महाराष्ट्र बँकेच्या शाखेत वटवून 39 लाख 92 हजार रुपयांचा अपहार केला आहे. कंपनीच्या लेखा परीक्षणात हा अपहार लक्षात आल्यावर तिघा संशयित विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - 'औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न'
हेही वाचा - अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या बालकाची हत्या; प्रियकरासह निर्दयी मातेला अटक