येवला (नाशिक) - येवल्यातील व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी गेल्या 50 वर्षांपासून दिवाळीतील पणत्या जपून ठेवल्या आहेत. त्यांच्याकडे पणत्यांचे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. वयाच्या तिसाव्या वर्षापासून पणत्यांचा संग्रह करण्याची त्यांना आवड होती. तेव्हापासून दर दिवाळीला विविध आकाराच्या पणत्या खरेदी करून आपला संग्रह अधिकाधिक समृद्ध करत आहेत. काळानुसार बदलत गेलेले पणत्यांचे स्वरुप देखील त्यांच्याकडे बघायला मिळत आहे.
दगडात कोरलेली, नारळाच्या करवंटीतील, लाकडी, मातीच्या तसेच विविध धातूंच्या, स्वस्तिक, पाने, फुले, चांदण्या अशा वैविध्यपूर्ण आकारातील पणत्यांसह कुंदन प्रकरातील कलाकुसर केलेल्या आणि नक्षीकामाने नटलेल्या वैशिष्टपूर्ण पणत्या आपणास येथे पाहावयास मिळतात. त्यातील राजस्थानी बनावटीची कासवाच्या आकारातील पणती ही आगळी-वेगळी बनवलेली असून त्यात कासवाच्या खालील बाजूस तेल टाकून वरील बाजूच्या तोंडाला वात टाकून ही पणती पेटवावी लागते, अशा विविध पणत्यांचा संग्रह त्यांच्याकडे पाहावयास मिळतो.
हेही वाचा- मटण बनविण्यास उशीर झाल्य़ाने मद्यपी पतीने पत्नीचे पाडले दात, औंध परिसरातील घटना