ETV Bharat / state

Bus Accident In Nashik : सप्तश्रृंगी घाटात एसटी बस 400 फूट खोल दरीत कोसळून अपघात; 1 महिला ठार, तर 18 प्रवासी जखमी - accident at Saptsringi Ghat

सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात 18 प्रवासी जखमी व 1 ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

Bus Accident In Nashik
सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघात
author img

By

Published : Jul 12, 2023, 9:14 AM IST

Updated : Jul 12, 2023, 12:56 PM IST

सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघात

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी घाटात एसटी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. खामगाव डेपोची मुक्कामी बस असून त्यात 23 प्रवासी प्रवास करीत होते. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया : नाशिक मधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

बस थेट घाटातील दरीत कोसळली : सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळल्यानंतर 1 महिला प्रवासी ठार तर 18 प्रवासी जखमी झाले आहेत. सप्तशृंगगड ते खामगाव (बुलडाणा) बस थेट घाटातील दरीत कोसळली आहे. या बसमध्ये 23 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर एक महिला प्रवासी मृत्यूमुखी पडली आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून पालकमंत्री दादा भुसे हे आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात आहे.

बसमध्ये 20 ते 25 प्रवासी : एसटी महामंडळाची बस सप्तशृंगीगडावरून खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वाणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बसमध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

चालकाचा ताबा सुटला : नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस पडत आहे. दाट धुक्याचा परिसर आणि सातत्याने पडणारा पाऊस यामुळे घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे बसचा भीषण अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी बचावपथक, रुग्णवाहिका तातडीने पोहोचल्या आहेत. समृद्धी महामार्गावर बुलडाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे, असे असतानाच आता नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचे समोर आले आहे.

जखमींची नावे : गजानन हपके (वय 39), प्रमिलाबाई बडगुजर (वय 65), रघुनाथ पाटील (वय 70), बाळू पाटील (वय 48), लक्ष्मीबाई गावंडे (वय 40), संजय भोईर (वय 60), सुशीला बडगुजर (वय 27), सरला पाटील (वय 65), सुशीला नजान (वय 65), लताबाई सूर्यवंशी (वय 75), यमुना गांगुर्डे (वय 40), विमलबाई भोई (वय 59), प्रतिभा भोई (वय 45), जिजाबाई पाटील (वय 65), मुन्नी खसिक (वय 68), सुरेखाबाई बडगुजर (वय 53), ज्योती पाटील (वय 29), संगीता भोई (वय 60), भरतीबाई पाटील (वय 52), रत्नाबाई पाटील (वय 52) असे जखमींची नावे आहेत. 08 रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. 14 रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी शिफ्ट केले आहेत. मृत महिलेचे नाव आशा राजेंद्र पाटील (वय 50 ते 55 वर्ष दरम्यान) असून त्यांचा अजून पत्ता कळलेला नाही.

हेही वाचा :

  1. Canada Accident: कॅनडामध्ये जेष्ठ नागरिकांना घेवून जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 15 ठार, 10 जखमी
  2. Tanker Accident: बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात; ऑइल गोळा करण्यासाठी नागरिकांनी केली एकच गर्दी
  3. Bus Accident On Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, बस ट्रकच्या अपघातात 20 प्रवाशी जखमी

Last Updated : Jul 12, 2023, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.