नाशिक - शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार मनमाड शहरात गवळी बांधवांनी पाडव्याला रेड्यांची मिरवणूक काढली. त्यानंतर आज त्यांची झुंज आयोजित करून दिवाळी साजरी करण्यात आली आहे.
देशात व राज्यात दिवाळी साजरी करताना अनेक परंपरा पाळल्या जातात. मनमाड शहरातील गवळी समाजात पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दर वर्षी प्रमाणे यंदाही ही परंपरा पाळत गवळी समाज व शहर दूध संघातर्फे रेड्यांची झुंज आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील अनेक गवळी बांधव आपले रेडे घेऊन आले होते.
झुंज पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. झुंज जिंकणाऱ्या रेड्याच्या मालकाला ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन रेडा व मालकाचा सन्मान करण्यात आला. जो पर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही, तो पर्यंत आमची दिवाळी साजरी होत नाही, असे गवळी बांधवांनी सांगितले.
हेही वाचा - एकनाथ शिंदे झाले पदवीधर.. नाशिक मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचे निकाल जाहीर