नाशिक - जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. आज सकाळी परमोरी येथे एका बिबट्याच्या हल्यात बालक गंभीर जखमी झाला आहे. शुभम राजेंद्र काळोगे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
शुभम घराजवळ खेळत असताना बिबट्याने हल्ला केला. बिबट्या शेजारी असणाऱ्या शेतातील ऊसात लपून बसला होता. बिबट्याने शुभमवर जोरदार हल्ला केला असून, त्याच्या मानेला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या परिसरात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसत आहे. बिबटयांसाठी ग्रामस्थ वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत. मात्र, पिंजरे दुसरीकडे लावत असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. बिबच्याच्या हल्ल्यात वणी बिटमध्ये म्हळूस्के येथे एकाचा मृत्यू झाला होता. लखमापूरध्येही एकाचा मृत्यू झाला होता. परमोरी येथेही बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. पिंपळगाव केतकीतही एकावर हल्ला झाला होता. एवढे हल्ले होऊनही परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.